शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
5
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
6
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
7
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
8
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
9
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
10
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
11
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
12
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
13
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
14
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
15
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
16
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
17
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
18
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
19
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
20
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

यमाच्या काळ्या छायेलाच रोखले ‘माय’च्या ममतेने...!

By admin | Updated: June 25, 2015 01:08 IST

दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखम

शिवाजी गोरे, दापोली : ‘देव तारी त्याला कोण मारी?’असे म्हटले जाते. अगदी त्याचप्रमाणे दाभोळ टेमकरवाडीतील डोंगर कोसळून दरड कोसळली. त्या दरडीचा काही भाग हरेकर कुटुंबियांच्या घरावरील मागच्या बाजूला येऊन पडला. दरडीच्या रेट्यामुळे चक्क सागाचे झाड, ज्या खोलीत आई आपल्या मुलांना कुशीत घेऊन झोपली होती, त्याच खोलीवर येऊन पडले. मृत्यूची छाया त्यांच्यासमोर उभी होती. परंतु दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखम झाली व हर्षला हरेकर यांचे कुटुंब अक्षरश: बालंबाल बचावले. हरेकर कुटुंबाचे दोन भावांचे एक घर आहे. त्या दिवशी दोन्ही कुटुंब आपापल्या मुलांना घेऊन आपल्या खोलीत झोपली होती. पुढे काय वाढून ठेवले आहे, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. त्या दिवशी आपल्या कुटुंबासोबत जेवण केल्यावर दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासह झोपायला गेले. रात्रभर पावसाचा जोर कमीच होत नव्हता. अचानक मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास डोंगर कोसळला व मोठ्याने आवाज होऊन दरड खाली आली. या दरडीत झाडे व घरे जमिनीत गाडली गेली. या डोंगराचा काही भाग हरेकर यांच्या घरावर येऊन धडकला. सागाचे एक मोठे झाड हरीश्चंद्र, हर्षला, सिद्धी, रिद्धी ज्या खोलीत साखरझोपेत होते, त्यांच्यावर येऊन पडले. डोंगराकडच्या भिंतीला भगदाड पडून दगड व झाडे खोलीत घुसले. परंतु, सुदैवाने चारहीजण बचावली. धो-धो पाऊस व त्यातच वीज नव्हती. त्यामुळे हा प्रकार कोणाच्याही लक्षात येत नव्हता. हर्षला आपल्या मुलींसह साखर झोपेत होती. मात्र जेव्हा झाड पडले, तेव्हा रिद्धी आणि सिद्धी आईच्या कुशीत होत्या. त्यामुळे यमाची काळी सावली त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. हरिश्चंद्र यांच्या मोठ्या भावाने व शेजाऱ्याने खोलीत घुसून त्या सर्वांना बाहेर काढले. त्यामुळे दुर्दैवी घटना टळली. अंधाऱ्या रात्रीत काळाने झडप घालण्याआधीच नातेवाईकाने खोलीतून ओढून बाहेर काढले. खोलीत झाड घुसल्याने बाहेर येता येत नव्हते. मृत्यू समोर उभा ठाकला होता. मात्र माय-लेकरांमधील अतूट मायेच्या धाग्यानेच जणू त्यांनी मृत्यूला थोपवून ठेवले आणि दोन मुलांचा पुनर्जन्मच झाला.