शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

रजिस्टर लिहिण्यावरून चिपळुणात ठेकेदार वेठीस

By admin | Updated: May 25, 2016 23:33 IST

मजूर सोसायटीची गळचेपी : रजिस्टर सापडली तीन वर्षांनी

चिपळूण : गुहागर तालुक्यातील मोडकाआगर, पालशेत, तवसाळ या प्रमुख राज्य मार्ग ४च्या किरकोळ दुरुस्तीचे काम २०१२मध्ये पूर्ण झाले. मात्र, बांधकाम विभागाने बिल न दिल्याने काम करणाऱ्या मजूर सोसायटीची गळचेपी सुरू आहे. काम सुरु असताना हरवलेली एमबी (रजिस्टर) तीन वर्षांनी सापडली. दरम्यान, त्या काळात असणाऱ्या शाखा अभियंत्यांची बदली झाल्याने आता रजिस्टर लिहायची कुणी? यावरून चालढकल केली जात आहे. हे काम करणाऱ्या पोटठेकेदाराची उपासमार होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूणच्या अंतर्गत २८ फेब्रुवारी २००९मध्ये मोडकाआगर, पालशेत, तवसाळ या रस्त्याचे किमी २१/०० ते किमी २१/६०० व किमी २३/४०० ते किमी २४/०० या धावपट्टीचे रुंदीकरण व किरकोळ दुरुस्ती करण्याच्या दोन वेगवेगळ्या वर्कआॅर्डर देण्यात आल्या. हे काम सुरू असताना तत्कालीन शाखा अभियंता अबंदे यांनी प्रथम एमबी लिहिली. त्यानुसार २०१०मध्ये रनिंग बिलही काढण्यात आले. मात्र, त्यानंतर एमबी गहाळ झाली. दरम्यानच्या काळात दोन्ही भागाचे काम २०१२मध्ये पूर्ण झाले. परंतु, एमबी हरवली असल्याने ती लिहिली गेली नाही. याच काळात शाखा अभियंता अबंदे यांची बदली झाली. त्यानंतर २०१५मध्ये चिपळूण बांधकाम विभागात एमबी सापडली. ही एमबी लिहून आपल्याला बिल मिळावे, यासाठी मजूर सोसायटीतर्फे प्रयत्न करण्यात आले. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. शिवाय आपण एमबी लिहिणार नाही. अबंदे यांनाच एमबी लिहायला सांगा, असे सांगण्यात आले. अबंदे यांच्याशी संपर्क साधला असता आपली बदली झाली आहे. तिथे असणाऱ्या शाखा अभियंत्याकडून एमबी लिहून घ्या, असे सांगण्यात आले.दोन शाखा अभियंत्यांच्या या चालढकलपणामुळे आजअखेर एमबी लिहून न झाल्याने चार वर्षे झाली तरी अद्याप बिलाचा पत्ता नाही. त्यामुळे मजूर सोसायटी व काम करणारे अडचणीत आले आहेत. तत्कालीन उपअभियंता व स्थानिक आमदार यांच्या कानावर वस्तुस्थिती घालण्यात आली. परंतु, पदरात निराशा पडली. ‘आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी आपली स्थिती झाल्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानी सांगितले. याप्रकरणी आमदार सदानंद चव्हाण यांचीही दोन दिवसांपूर्वी भेट घेण्यात आली. आपल्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षा संबंधित मजूर सोसायटी व पोटठेकेदार बाबू चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)बांधकाम खात्याचा कारभार : बिल न देताच रक्कम अदाबांधकाम खात्याचा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मोडकाआगर, तवसाळ रस्त्याची २०१२मध्ये साईडपट्ट्या भरल्या व दुरुस्ती केल्यानंतर २०१४मध्ये याच रस्त्याच्या कामावर कारपेट व सीलकोट करण्यात आले. सुरुवातीला केलेल्या कामाचे बिल न देताच त्यानंतर केलेल्या कामाचे बिल काढण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या आडमुठ्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.