शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

एच्आय्व्ही चाचण्यांबाबत महिलांमधील जागृती वाढतेय..!

By admin | Updated: June 25, 2014 00:49 IST

१२ वर्षात जिल्ह्यातील १,८३,९७१ नागरिकांनी चाचण्या करून घेतल्या

रत्नागिरी : आरोग्य विभाग, सेवाभावी संस्था तसेच प्रसार माध्यमांमुळे समाजात आता एड्सबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली असून, महिलांमध्येही सजगता निर्माण झाली आहे. येथील एकात्मिक समुपदेशन आणि तपासणी केंद्राचा (आय. सी. टी. सी.) आधार घेऊन गेल्या १२ वर्षात जिल्ह्यातील एकूण १,८३,९७१ नागरिकांनी या चाचण्या करून घेतल्या. विशेष म्हणजे यात ८९,६३१ इतकी महिलाची संख्या आहे. तर होणाऱ्या बाळाच्या काळजीपोटी १,०२,५३८ गरोदर मातांनी या तपासण्या स्वेच्छेने करून घेतल्या.एड्स रोगाबाबत समाजात अजुनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अगदी पुरूषवर्गही या चाचण्या करू घेण्यास तयार होत नाही. महिला वर्ग तर एकंदरीत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षच करत असतात. त्यामुळे या चाचण्या करून घेण्याबाबतही त्यांच्यात एक प्रकारची भीती असायची. मात्र, आता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षांतर्गत (ऊ्र२३१्रू३ अ्र२ि ढ१ी५ील्ल३्रङ्मल्ल उङ्मल्ल३१ङ्म’ वल्ल्र३ - ऊअढउव) सुरू असलेले समुपदेशन केंद्र तसेच विविध सामाजिक संस्थांचे जनजागृतीत असलेले योगदान यामुळे पुरूष आणि महिलाही या केंद्राच्या चाचण्या करून घेण्यास अनुकुलता दाखवू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाचे दोन आयसीटीसी विभाग, उप जिल्हा रूग्णालये, उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये आणि ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळून मे २००२ ते मार्च २०१४ पर्यंत ९४,३४० पुरूष आणि ८९,६३१ स्त्रियांनी या चाचण्या करून घेतल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या जनजागृती मोहिमेमुळे एच. आय. व्ही. बाधितांची २००२ साली असलेली ३३.६३ इतक्या टक्केवारीत घट होवून ती आता ३.०३ वर आली आहे. रत्नागिरीतील जिल्हा रूग्णालयात आयसीअीसी या केंद्राची निर्मिती झाल्यानंतर म्हणजे २००२ साली केवळ २८ महिलांनी तर २००३ साली १०० महिलांनी तपासणी करून घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यानंतर आरोग्य विभागाने इतर सामाजिक घटकांच्या सहकार्याने समाजात केलेल्या पोस्टर्स, व्याख्याने, स्लाईडस शो, पथनाट्य आदी उपक्रमाने लोकांच्या मनातील भीती हळूहळू कमी होवू लागली. त्यामुळे आता चाचण्या करून घेण्यास पुरूषांबरोबरच महिला वर्गाची संख्या वाढली आहे.माता - पिता एच. आय. व्ही बाधित असले तरी जन्मास येणारे बालक येथील उपचाराने निरोगी होऊ शकते, ही बाब समुपदेशनाद्वारे महिलांपर्यंत किंवा एकंदरीत समाजापर्यंत पोहोचू लागली आहे. त्यामुळेच आता येणारे बाळ निरोगी यावे, या विचाराने जिल्ह्यातील गरोदर माता या चाचण्या करण्यास तयार होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)