शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाणीज येथून महिलेचे दागिने लांबवले

By admin | Updated: December 20, 2014 23:35 IST

चोरट्याचा छडा लावण्यासाठी नाकेबंदी

रत्नागिरी : टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या एका महिलेच्या सोन्याचे दागिने, मोटरसायकलवरुन आलेल्या एका अज्ञात स्वाराने लांबवल्याने पुन्हा एकदा धूमस्टाईल चोरट्यांनी डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना पालीजवळील नाणीज येथे सायंकाळी ४ वा. सुमारास घडली.स्थानिक ग्रामस्थ आणि पाली पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी या चोरट्याचा छडा लावण्यासाठी नाकेबंदी केली मात्र हा चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला. चोरवणे येथील संध्या सुधाकर पांचाळ (३४) या नाणीज येथे टेलरिंगचा व्यवसाय करतात. आज नित्यनियमाने त्यांनी सायंकाळी ४ वा. सुमारास आपले दुकान बंद करुन आपल्या गावी चोरवणे येथे अनिषा अजय पितळे व विजया विजय सिदम या दोन महिलांसह आड मार्गाने घरी चालल्या होत्या. रस्त्याचे काही अंतर कापल्यावर एक धूम स्टाईल पल्सर मोटरसायकलवरुन तोंडाला स्कार्फ बांधून त्यांच्यापुढे गेला व पुन्हा त्याच वेगाने गाडी वळनू या महिलेच्या दिशेने आला व डोळ्याचे पाते लवते न लवते या क्षणात पांचाळ यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चैनी व एक मंगळसूत्र असे अंदाजे ५० हजार रुपयाचे दागिने लांबवले. ग्रामस्थांना ही बातमी कळल्यानंतर त्यातील काही तरुणांनी तो चोरटा ज्या दिशेने गेला, त्या कोल्हापूर रोडच्या दिशेने त्याचा पाठलाग केला मात्र तो कोठेही आढळून आला नाही. मात्र त्यानंतर ही घटना गावात कळल्यावर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गोळा झाले व त्यांनी पाली दूरक्षेत्राशी संपर्क साधला पालीचे सहाय्यक पो. निरीक्षक प्रल्हाद पाटील, हेड कॉन्स्टेबल रमेश चव्हाण यांनी पाहणी केली. (प्रतिनिधी)