शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात वादळी पाऊस

By admin | Updated: June 19, 2015 00:18 IST

बांद्याला चक्रीवादळाचा फटका : बारा लाखांची हानी; विजेचे खांब उन्मळून पडले

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, गुरुवारी चक्रीवादळाचा बांदा शहराला फटका बसला आहे. अनेक झाडांबरोबरच विजेचे दहा खांब उन्मळून पडले आहेत, तर आचरा गाऊडवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे तसेच मातोंड येथील घरांचे व देवगड तालुक्यातील वाडा मुळबांध येथील गुरांच्या गोठ्याची अंशत: हानी झाली. जिल्हाभरात वादळी पावसामुळे सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले आहे. हा नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, समुद्र किनारपट्टीवर धोक्याची घंटा कायम असून, मच्छिमारांना हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ७७.३८ मि.मी.च्या सरासरीने ६१९ मि.मी. पाऊस पडला. मालवण तालुक्यातील आचरा गाऊडवाडी भागात बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळासह आलेल्या पावसाने कमलाकर पांगे यांच्या घराचे छप्पर उडून ६० हजारांचे नुकसान झाले. घरातील अन्नधान्य, किमती वस्तू भिजून मोठ्या प्रमाणात हानी झाली. समुद्राच्या दिशेने आलेले वादळी वारे डोंगरभागाकडे सरकल्याने मोठी हानी टळली. कमलाकर पांगे यांच्या घराशेजारी राहणारे प्रशांत पांगे यांच्या स्लॅबच्या घरावरही आंब्याचे झाड पडले, परंतु सुदैवाने हानी टळली. वादळाचा जोर कमी होताच वाडीतील ग्रामस्थांनी धाव घेत कमलाकर पांगे यांच्या कुटुंबियांना धीर देत मदतकार्य केले. यावेळी नरेश तारकर, जगदीश पांगे, तानाजी पांगे, भाऊ गावकर, मोहन पांगे, जगदीश पडवळ, नारायण पडवळ यांनी पांगे कुटुंबियांचे अस्ताव्यस्त पडलेले सामान सुरक्षित जागेत हलविले.पांगे कुटुंबियांचा संसार पावसात भिजत होता. प्रशासनाच्या मदतीची वाट न बघता आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर, राजन पांगे, चंदन पांगे, जगदीश पांगे व जुबेर काझी यांनी पांगे कुटुंबियांचे घराचे छप्पर उभे करण्यासाठीचे काम हाती घेतले होते.यावेळी आचरा गावचे तलाठी बी. जे. मुंबरकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करत पंचयादी केली. अनंत पांगे यांच्या घरावरही झाड पडून पडवीचे सुमारे २५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील आरती सामंत यांच्या घराचे पत्रे उडाल्याने ९३ हजारांचे तर मातोंड येथील सुजाता कुडव यांच्या घराचे पत्रे उडाल्याने ४ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद ओरोस येथील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात नोंद झाली आहे. वाडा मुळबांध येथील जयवंत भिकाजी जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर आंबा कलमाचे झाड कोसळून सुमारे चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)बांद्याला चक्रीवादळाचा फटकाबांदा शहरातील लकरकोट, मिठगुळी परिसरात चक्रीवादळासह झालेल्या पावसाने कित्येक झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्यात. वीज वितरण कंपनीचे तब्बल दहा विद्युत खांब उन्मळून पडल्याने या भागातील वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित झाला आहे. या चक्रीवादळाने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.