शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

येत्या २४ तासात वादळी पाऊस

By admin | Updated: September 1, 2014 23:07 IST

हवामान खाते : जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण ८८२ मिलिमीटर, तर सरासरी ९८.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात १४५ मिलिमीटर झाली आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचे तसेच काही ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान उद्या मंगळवारी २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.चिपळूण तालुक्यात टेरव येथील भागुजी बारकू कदम ही ३१ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० पासून बेपत्ता असून, ती वाहून गेल्याचा अंदाज आहे. याबाबत तपास सुरू आहे. गुहागर - वेलदूर रस्त्यावरील बांध कोसळला. मात्र, वाहतूक सुरळीत आहे. राजापूर तालुक्यात कोदवली नदीची पातळी ५.५० मीटर झाल्याने नगरपरिषदेमार्फत नागरिकांना भोंगा वाजवून धोक्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु शहरात पाणी घुसल्याची नोंद करण्यात आलेली नाही. गुहागर तालुक्यातील ५ घरांमध्ये पाणी घुसल्याने १ लाख ६ हजार १२० रुपयांचे नुकसान झाले असून, घरतवाडी तर्फ वेलदूर या गावातील रस्त्याची संरक्षक भिंंत कोसळली आहे. मंडणगड तालुक्यातील मौजे घुमरी येथे ३१ रोजी सायंकाळी ७.२० वाजता दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती, ती आज सुरू करण्यात आली आहे. नांदिवडे - आंबूळवाडी येथे बोट बुडाली. या बोटीत असलेले सातही खलासी वाचले आहेत. संगमेश्वर तालुक्यात कोल्हापूर रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक काही वेळ बंद होती. खेड तालुक्यात मौजे उदय खुर्द येथे टेम्पो- एस. टी. -क्वालिसचा अपघात झाल्याने क्वालिसमधील दोघांचा मृत्यू झाला व दोन जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाने दिली आहे. (प्रतिनिधी)मच्छिमारांना इशारा...जिल्ह्यात २ सप्टेंबरपासून पुढील २४ तासात अनेक ठिकाणी ७ ते १२ सेंटीमीटरपर्यंत पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. दक्षिण नैऋत्येकडून तासी सुमारे ४५ ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला राहील. तसेच दक्षिण नैऋत्येकडून मोठ्या लाटा समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी पुढील २४ तासांत मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान.पावसामुळे जिल्हाभरात पूरसदृश स्थिती निर्माण.सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात.जिल्ह्यात सरासरी ८८२ मिलिमीटर पावसाची नोंद.गुहागर तालुक्यातील पाच घरात पाणी घुसले.