शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीसाठी विद्यार्थ्याचे वय कमी होणार?

By admin | Updated: October 26, 2014 23:25 IST

किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन

रत्नागिरी : पहिलीमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश देताना वयाची अट किमान पाच वर्ष अकरा महिने ठेवण्याचा निर्णय विचाराधीन आहे. नवीन शैक्षणिक वर्षात जूनमध्ये प्रवेश देण्यासाठी नवीन अटीची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात नव्याने स्थापन होणाऱ्या शासनाकडून त्यास मान्यता देण्यात येणार आहे.पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाची अट निश्चित करण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे विविध स्तरावरून संशोधन करण्यात आले होते. त्यासाठी समित्या स्थापन केल्या होत्या. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये शिक्षण हक्क कायद्याच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेदरम्यान या प्रकारामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शालेय प्रवेशासाठी राज्यभरात एक समान धोरण असावे, म्हणून राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या एक सदस्यीय समितीला त्यावरील संभाव्य उपायांचा विचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार माने यांच्या समितीने हा अहवाल तयार केला असून सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.पहिली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे अपेक्षित वय, प्रवेशाचे वय कोणत्या तारखेला ग्राह्य धरायचे, याचाही या अहवालाच्या निर्मितीदरम्यान विचार करण्यात आला आहे. त्यानुसार ३१ जुलै रोजी ५ वर्षे ११ महिने पूर्ण करणाऱ्या बालकांनाच पहिलीला प्रवेश दिला जावा, अशा सूचना या अहवालामध्ये करण्यात आल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण हक्क कायद्यामधील २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाबाबतचे वेळापत्रक देखील लवकरच जाहीर केले जाणार आहे. प्राथमिक शिक्षण प्रवेशासाठी किमान साडे तीन वर्षाची अट घालण्यात आली होती. त्यामुळे पहिलीतील पाल्य ६ ते ७ वयोगटातील असे. परंतु वय कमी करण्याच्या निर्णयामुळे सर्वसाधारण पहिलीतील विद्यार्थी किमान ६ वयोगटातील असणार आहे. (प्रतिनिधी)