शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात रासप मजबूत करणार

By admin | Updated: August 1, 2016 00:22 IST

बाळासाहेब दोडतले : कापसाळ येथे कार्यकर्त्यांची बैठक

चिपळूण :कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाची स्थिती मजबूत नाही. त्यासाठी गाव तिथे शाखा निर्माण हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपण राबवावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी समाजात वातावरण निर्मिती करावी, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी शुक्रवारी केले. यावेळी अशोक पवार यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर राज्य कार्यकारिणीने सर्वच जिल्ह्यात पक्ष मजबूत होण्यासाठी दौरे सुरु केले आहेत. पक्षातर्फे बहादूरशेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली. त्यानंतर कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष दादा केतकर, सुरेश बनकर, अनिल शेजाळ, नितीन धायगुडे, संतोष हिरवे, भगवान ढेंबे आदी उपस्थित होते. सचिव दोडतले म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे. कोकणात पक्षाची स्थिती नाजूक आहे. मात्र, जानकरांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी सुचवलेली कामे होण्यास मदत होणार आहे. पक्ष बळकटीसाठी गाव तेथे शाखा हे अभियान सुरु करावे. जिल्हा तसेच तालुका कार्यकारिणी त्वरित नेमून जनतेची कामे करण्यावर भर द्यावा. विविध स्तरातील समाजाचे प्रश्न हाताळावेत. लोकांची कामे होण्यासाठी पाठपुरावा करावा. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवून संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत. सदस्य नोंदणी जोमाने करावी, तसेच जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष म्हणून खेर्डीतील अशोक पवार यांची फेरनिवड केली, तर दाभोळ येथील संजय कलगुटकर व चिपळुणातील सुरेश पड्याळ या दोघांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली. पक्षवाढीसाठी त्यांना सक्रिय राहण्याची सूचना केली. यावेळी राम नलावडे, संतोष माने, राजाराम पालांडे, परशुराम पवार, बाळासाहेब ढेंबे, डॉ. विलास शेळके, श्याम गवळी, दिनकर नलावडे, विष्णू दोडमनी, महेश पिसे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)