शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा दुरुस्ती रखडणार?

By admin | Updated: July 17, 2014 23:53 IST

जिल्हा परिषद : रत्नागिरी तालुक्यात ५८ वर्गखोल्या मोडकळीस

रत्नागिरी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४३ प्राथमिक शाळांच्या ५८ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव रत्नागिरी पंचायत समितीकडे देण्यात आले आहेत. प्रस्ताव पाठवले खरे, मात्र यासाठी जिल्हा परिषदेकडे आलेला निधीच अपुरा असल्याने यंदा या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या दुरुस्त होतील की नाही, हा प्रश्नच आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाते. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी सर्वशिक्षा अभियानातून कोट्यवधी रुपये दरवर्षी करण्यात येत आहेत. जिल्ह्यात या सर्वशिक्षा अभियानातून सुमारे एक ते दीड हजार वर्गखोल्या बांधण्यात आल्या. मात्र, आता या अभियानातून वर्गखोल्या बांधण्यासाठीचे अनुदान बंद करण्यात आले आहे.रत्नागिरी पंचायत समितीकडून तालुक्यातील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांचे प्रस्ताव शाळांकडून मागविण्यात आले होते. त्याप्रमाणे करबुडे खापरेकोंड, करबुडे मूळगाव, कुरतडे नं. १, तरवळ - बौध्दवाडी, हरचिरी उर्दू, सैतवडे नं. १, कर्ला उर्दू मुलांची, कर्ला मराठी, वाटद नं. १, चवे निवई, देऊड गावातील, देऊड चाटवळ, कोतवडे वारेवाडी, तोणदे आगाशेकोंड, पाली नं. २, तरवळ नं. १, पन्हळी, कोळंबे धामेळे, रीळ, मालगुंड नं.१, खेडशी डफळचोळ, सोमेश्वर कीरबाग, गणेशगुळे, कशेळी नं. १, वाटद मिरवणे, चाफे नं. १, वाटद मिरवणे, चाफे नं. १, देऊड लावगण नं. २, गावखडी गुरववाडी, खानू नं. १, हातखंबा तारवेवाडी, वेळवंड नं. २, चांदोर नं. ५, पावस भाटीवाडी, खालगांव नं. २, वाटद खंडाळा, कोळंबे नं. ३, सांडेलावगण या प्राथमिक शाळांतील वर्गखोल्यांचा दुरुस्तीच्या प्रस्तावांमध्ये समावेश आहे.या वर्गखोल्यांची दुरुस्ती जिल्हा वार्षिक योजनेतून आणि सेसफंडाच्या अनुदानातून करण्यात येते. वर्गखोल्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला शासनाकडून यंदा केवळ ६० लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे या तुटपुंज्या अनुदानातून रत्नागिरी तालुक्यातील दुरुस्तीची किती कामे होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून ही दुरुस्ती यंदा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. (शहर वार्ताहर)