शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जुने-नवे संघर्ष रंगणार?

By admin | Updated: October 21, 2014 23:45 IST

रत्नागिरी मतदारसंघ : शिवसेनेत पदांवरून साठमारी सुरू!

रत्नागिरी : आमचा जुन्या शिवसैनिकांना कोणताही उपद्रव होणार नाही, असे राष्ट्रवादीतून कार्यकर्त्यांसह सेनेत पक्षांतर करणाऱ्यांनी सांगितले असले तरी पक्षातील पदांवरून जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच धूसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील जुन्या-नव्यांमधील संघर्ष रंगण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला स्वीकारले, परंतु आपली पदे नव्यांना हिसकावू द्यायची नाहीत, यासाठी ‘जुन्यां’कडून रणनीती आखली जात आहे. तर पदांचीच सवय झालेल्या नव्यांना पदांशिवाय राहण्याची सवय नसल्याने पदांसाठी ‘आगे बढो’ असे सूत्र अवलंबिले जात आहे. त्यामुळेच हा संघर्ष वाढण्याची चिन्हे ठळक झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी विधानसभेची जागा ही सेना-भाजपाची युती असल्याने भाजपाच्या वाट्याला आली होती. २००४ पासून सतत तीनवेळा भाजपा उमेदवार बाळ माने यांना कोणामुळे पराभव पत्करावा लागला, याचाही उलगडा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून झाला आहे. सेनेतीलच ‘राजकीय शाखेची’ हाराकिरी हा विषय त्यातून अधोरेखित झाला. त्यामुळे नव्यांच्या आगमनाने जुन्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यास रत्नागिरीतून प्रथम मिळणारी विधानसभेची उमेदवारी देण्यावरून जुन्यांमध्ये असंतोषाची पहिली ठिणगी उडाली होती. यावरून आठवडाबाजारमधील कार्यालयात झालेल्या पहिल्याच सभेत खडाजंगीही झाली होती. गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी मतदारसंघ सेनेला मिळावा ही कार्यकर्त्यांची मागणी होती. यावेळी युती तुटल्याने ही संधी शिवसैनिकांना चालून आली होती. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकही येथून जिंकायचेच या जिद्दीने कामालाही लागले होते. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी तालुक्यात अतिशय नेटकेपणे संघटना बांधणीचे काम केले होते. त्यांना उमेदवारी जवळ-जवळ निश्चित झाली होती. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मात्र आयत्यावेळी वायुवेगाने घडामोडी झाल्या अन आपला उमेदवार निवडून आणण्याची कार्यकर्त्यांची उमेदच निघून गेली. नेत्यांचा असंतोष थंडावला तरी कार्यकर्त्यांतील असंतोषाची धग अद्यापही कायम आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळणारी उमेदवारी तर गेलीच परंतु पक्षात आलेल्या नव्यांकडून आता संघटनेतील पदांसाठी साठमारी सुरू होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. निरलस भावनेतून पक्षाचे कार्य करणारे कार्यकर्ते आता कमी आहेत, ही वस्तूूस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळेच दुसऱ्या पक्षातून आलेले पदाधिकारी हे केवळ कार्यकर्ता बनून राहणार नाहीत हेही तितकेच खरे आहे. इथुनच जुुने-नवे वादाची सुरुवात होते. विधानसभेची निवडणूक आता झालीय म्हणजेच कोंढाण्याचे लग्न झालेय, आता पक्षात आलेल्या नव्या सुभेदारांसाठी पक्षाच्या कोणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आपल्या पदांचे गड खालसा करावे लागणार हा खरा प्रश्न आहे. निष्ठावंताच्या उमेदवारीचा बळी आधीच गेलाय आता जुन्यांची कोणती व किती पदे पणाला लागणार, हाच कळीचा मुद्दा बनला आहे. असंतोषाची ही धग वाढती असून त्यामुळे जुने-नवे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)असंतोषाची धग थांबणार कशी?आपली पदे हिसकावू द्यायची नाहीत यासाठी जुन्या कार्यकर्त्याकडून रणनीतीची आखणी.नव्या कार्यकर्त्यांनाही हवी संघटनेतील गडांची सुभेदारी.प्रथमच मिळालेल्या उमेदवारीचा बळी गेलाच आता पदे पणाला न लावण्याचा जुन्यांचा निर्धार. नेत्यांचा असंतोष थंडावला असला तरी कार्यकर्त्यांमधील असंतोषाची धग अद्यापही कायम. पक्षप्रमुखांच्या आदेशाला दिला शिवसैनिकांनी मान.