शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाचे राजकारण रंगणार?

By admin | Updated: July 19, 2016 00:25 IST

महिला आरक्षण पडल्यास ‘गोची’? : सेना, भाजप, राष्ट्रवादी तिरंगी लढत

!रत्नागिरी : रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या डिसेंबर २०१६मध्ये होऊ घातलेल्या थेट निवडणुकीच्या राजकीय सारीपाटावरील फासे कोणाच्या बाजूने पडणार आणि नगराध्यक्ष कोण होणार, याची मोठी उत्सुकता रत्नागिरीकरांना आहे. ही निवडणूक खुल्या पध्दतीने झाल्यास इच्छुकांमध्ये पुरुष उमेदवारांचा भरणा अधिक आहे. मात्र, महिलांसाठी हे पद आरक्षित झाले, तर गेल्या वर्षभरापासून उराशी बाळगलेले अनेकांचे स्वप्न धुळीस मिळणार आहे. महिला आरक्षण पडलेच, तर आपल्या घरातील कोणाची वर्णी लावायची, याचीही तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद निवडणुकीचे राजकारण चांगलेच रंगणार असल्याची चिन्ह आहेत. रत्नागिरी पालिकेत सध्या सेनेचे बहुमत असूनही भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांची सत्ता आहे. युती तुटल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सेना व भाजपमध्ये विळ्या - भोपळ्याचे सख्य आहे. अनेक विषयांवरून दोन्ही पक्षात टोकाचे वादंग होऊन दरी वाढली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष पालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. तसा स्वबळाचा नाराही दिला आहे. स्वबळावर सर्व जागा लढवण्याची क्षमता कॉँग्रेस पक्षाकडे नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर आघाडी करण्याशिवाय कॉँग्रेसकडे पर्याय नाही. या स्थितीत पालिका निवडणुकीत कॉँग्रेस आघाडी व सेना आणि भाजप अशी तिरंगी लढत अपेक्षित आहे.महेंद्र मयेकर हे गेल्या दोन वर्षांपासून नगराध्यक्षपदी आहेत. थेट निवडणुकीत उभे ठाकण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी ते तयारीही करीत आहेत. भाजपमध्ये माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर हे सुध्दा नगराध्यक्षपदासाठी पुन्हा इच्छुक आहेत. सध्याच्या राजकारणात नसलेल्या भाजपच्या शिल्पा पटवर्धन व अन्य काही मंडळीही या पदासाठी इच्छुक आहेत.भाजपतर्फे महेंद्र मयेकर यांना पुन्हा नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यास पक्षातून विरोध होणार की हा विरोध मोडून काढण्यात ते यशस्वी ठरणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. शिवसेनेत नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. तरीही त्यात माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राहुल पंडित, राजेश सावंत, बंड्या साळवी यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.महिला आरक्षण पडलेच, तर शिल्पा सुर्वे यांचे नावही चर्चेत आहे. मात्र, महिला आरक्षण पडले तर सेनेतील या पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा धुळीला मिळण्याची भीतीही व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीतून उमेश शेट्ये, सुदेश मयेकर यांची नावे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे या पदांवर कोणाची वर्णी लागते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)एका खुर्चीसाठी इच्छुकांचे डावपेच : सत्तेच्या सारीपाटात गुंतले मुरब्बीगेल्या विधानसभा निवडणुकीत शहरात भाजपची मते अधिक असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला त्यांच्याच पक्षाचा नगराध्यक्ष निवडून येणार असा विश्वास आहे. मात्र, भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. त्यातून मार्ग काढताना वरिष्ठांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे.नगराध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पत्ता कसा कट करायचा, या रणनीतीमध्ये मुरब्बी उमेदवार गुंतले आहेत. सेनेतील नगराध्यक्षपद उमेदवारीचे दावेदार मिलिंद कीर हे राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार उमेश शेट्ये यांच्यामागे एकेका प्रकरणाचा ससेमिरा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.राष्ट्रवादीची ताकद कमी असल्याने व विरोधकांचा विरोध मोडून काढण्यासाठी सेनेतच प्रवेश करण्यासाठी उमेश शेट्ये इच्छुक असल्याची चर्चा आहे. सेनेतील नगराध्यक्षपदाचे राजकारण चरम सीमेवर पोहोचले असून, इच्छुकांना गारद करण्यासाठी उमेश शेट्ये यांनाच सेनेत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.