शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

कोयत्याने वार करून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:43 IST

लांजा : वेडाच्या भरात पतीने लाकडे तोडण्यासाठी घेऊन गेलेल्या कोयत्याने पत्नीच्या डोक्यात व अंगावर सपासप वार करून तिचा खून ...

लांजा : वेडाच्या भरात पतीने लाकडे तोडण्यासाठी घेऊन गेलेल्या कोयत्याने पत्नीच्या डोक्यात व अंगावर सपासप वार करून तिचा खून केला. ही घटना पन्हळे येथे रविवारी दुपारी घडली असून, संशयित म्हणून पतीला पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत लांजा पोलीस यांनी दिलेली माहिती अशी की, पन्हळे आनंदगाव येथील समीक्षा संजय मसणे (वय ३२) सकाळी कपडे धुवून आल्यानंतर बेलाची उतरन या ठिकाणी आपल्या काजूच्या बागेत लाकूड आणण्यासाठी सकाळी अकरा वाजता गेली होती. तिचा पती संजय तुकाराम मसणे (३४) हा तिच्या पाठोपाठ जाताना त्याच्या धाकट्या भावजयने पाहिले आणि आपले सासरे तुकाराम यांना मोबाईलवर फोन करून याबाबत सांगितले.संजय याचे वडील जनावरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. धाकट्या सुनेचा फोन आल्यानंतर त्यांनी ती कुठे लाकडे आणण्यासाठी गेली आहे, याचा शोध सुरूकेला. समीक्षा हिच्या मागावर असलेल्या पती संजय याने बेलाची उतरण या ठिकाणी काजूच्या बागेत लाकडे आणण्यासाठी गेलेल्या पत्नीला गाठून प्रथम तिच्या डोक्यात दगड घातला. लाकडे तोडण्यासाठी घेऊन गेलेला कोयता संजय याने हिसकावून घेतला अन् पत्नीच्या डोक्यावर, कानावर, डोक्याच्या खालच्या भागावर सपासप वार केल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडली.याच दरम्यान, तिचे सासरे तिचा शोध घेत होतेच. मात्र, सासरेपोहोचण्याअगोदरच समीक्षावर हल्ला केल्याने ती तडफडत होती. शोध घेत बेलाची उतरण येथील काजूच्या बागेत पोहोचले असता त्यांना आपली सून रक्ताच्या थारोळ्यात पडून तडफडत असल्याचे पाहिले. वडिलांची चाहूल लागल्याने संजय याने तेथून पळ काढला.सुनेला वाचविण्यासाठी सासऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला. रस्त्याच्या आजूबाजूला जनावरे चारण्यासाठी असलेल्या गुराख्यांनी आरडाओरडा ऐकून धाव घेतली. उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी तिला उचलली; मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचा मृतदेह घरी आणण्यात आला.पन्हळे मसणेवाडीतील महिलेचा खून झाल्याची खबर पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव पाटील, पोलीस निरीक्षक विकास गावडे, उपनिरीक्षक पंडित पाटील, संदीप पाटील, पोलीस कर्मचारी श्रीकांत जाधव, शांताराम पंदेरे, पांडुरंग खिल्लारे, दीपक कारंडे, चालक चेतन घडशी, आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संशयित आरोपी संजय हा काहीच घडले नाही, अशा आविभार्वात होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.संशय होताच, आता खरा ठरलातो गेल्या आठ दिवसांपासून विचित्र वागत असल्याने हा काहीतरी घातपात करील असा संशय मृत समीक्षा हिच्या जावेला आल्याने तिने दीर समीक्षाच्या पाठोपाठ गेल्याची पूर्वकल्पना आपल्या सासºयांना दिली; मात्र तरीही समीक्षा वाचू शकली नाही. समीक्षा हिला एक पाच वर्षांची व तीन वर्षांची अशा दोन मुली आहेत.