शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बाप्पाचे म्हणणे काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत ...

कोणताही व्यवसाय करताना त्यातून पैसा कमविणे हेच व्यावसायिकाचे मुख्य ध्येय असते. सुरूवातीला नवनिर्मितीचा आनंद असतो पण जसजसा पैसा मिळत जातो, तसतशी निर्मितीच्या आनंदाची जागा पैशातून मिळणारा आनंद घेतो. ह्या वाढत्या व्यवसायामुळे निसर्गाची होणारी हानी दुर्लक्षित केली जाते. आपण गणपतीच्या मूर्ती निर्मितीच्याच व्यवसायाचे उदाहरण घेऊया. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सुरुवातीला थोड्या प्रमाणात होणाऱ्या या गणेशोत्सवाने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. उंचच उंच मूर्ती, त्यातसुद्धा स्पर्धा लागू लागली. वेगवेगळे देखावे व ते बघण्यासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगा, कुटुंब विभक्त होत गेली तसतशी मूर्तींची संख्या वाढू लागली तसतसे कारखाने वाढू लागले. सार्वजनिक गणेशोत्सवात तर राजकारणही घुसले. नवसाला पावणारा गणपती, हा इकडचा राजा तो तिकडचा राजा अशा निरनिराळ्या बिरुदावली लावून लोकांना आपल्याकडे वळवून घेण्याची स्पर्धा वाढली.

सार्वजनिक गणपती वाढण्यामागचे कारण त्याच्याविषयीची भक्ती नव्हती तर होता वर्गणी मागचा पैसा तसेच नवसाला येणारे दागिने व इतर गोष्टी. आता तर गणपती परदेशातसुद्धा जाऊ लागले, त्यांची निर्यात होऊ लागली. जूनपूर्वीच मूर्तीने भरलेले कंटेनर जहाजाने परदेशी रवाना होतात. हा सर्व पैशांसाठी होणारा खेळ आहे. त्या बाप्पाच्या मूर्तींना आपण एक ‘विक्रेय वस्तू’ नफा मिळवून देणारे उत्पादन बनवलं आहे हे चूक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपती बनविण्यासाठी कोठून तरी परप्रांतातून शाडूची माती आणली जाते, तिच्या मूर्ती बनवून त्या जगभर विकल्या जातात हा पर्यावरणीक अपराध आहे. या व्यापारातून निसर्गाची प्रचंड हानी होते आहे आणि त्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. मुंबईतील मोठे, छोटे गणपती समुद्रात बुडवूनही अखंड राहतात. त्यांना दुसऱ्या दिवशी महानगरपालिका गोळा करून क्रशरमध्ये टाकून बारीक करते. केवढी ही विटंबना त्या गणेशाची. पण दरवर्षी हे होतच असते व त्याचे सुखदुःख कोणालाच नसते. सध्याच्या महागाईत कितीतरी जण केवळ नाईलाज म्हणून बाप्पा आणतात, कारण खर्च करण्याची त्यांची ऐपत नसते. एकदा आणला की कायमचा आणला पाहिजे, ही अंधश्रद्धा त्यांना तसे करायला भाग पाडते. चराचरात ईश्वराचे अस्तित्त्व आहे. असे असताना घरात गणपती आणला तरच त्याचे अस्तित्व आहे हे मानणे किती योग्य आहे? टिळकांनी गणपती आणला तोच मुळी राजकारणाच्या दृष्टिकोनातून शिवजयंतीला ‘काऊंटर ॲटॅक’ म्हणून.

बाप्पाचे विसर्जन करण्याचा मन उद्विग्न करणारा एक प्रकार मला मध्यप्रदेश व धुळे येथे बघायला मिळाला. जयपूरवरून आम्ही पुण्याला येत होतो. रात्री दीड वाजता आम्ही शिरपूर गावात पोहोचलो. त्या गावातून दुभाषी नदी वाहते, नदीवर पूल आहे पण नदीवर जाण्यासाठी मार्ग नाही. आम्ही जेव्हा पुलावर आलो तेव्हा तेथे दोन मोठे गणपती ‘लॉरी’मधून पोलीस बंदोबस्तात आणले होते. त्यांच्याबरोबर एक क्रेनसुद्धा होती. पुढे काय होतंय ते पाहण्यासाठी आम्ही पुढे जाऊन थांबलो, दोन लॉऱ्यांपैकी एक पुलाच्या एका बाजूला तर दुसरी पुलाच्या दुसऱ्या बाजूला खेटून उभी राहिली, बाप्पाची उंची पुलाच्या रेलिंगच्या वरती होती. बाप्पाच्या नावाचा गजर झाला, क्रेन पुढे सरकली व तिच्या हुकाने मागच्या बाजूने बाप्पाला जोरकस धक्का दिला आणि बाप्पा नदीत पडला. दोन्ही बाप्पांचे असेच विसर्जन झाले याला विसर्जन म्हणावे का? एवढ्या उंचीवरून बाप्पाला अक्षरशः फेकून दिले होते. लहान, मोठ्या सगळ्याच बाप्पांचे विसर्जन असेच होते. या सगळ्या प्रकारात त्या गजाननाविषयी श्रद्धा कोठेच दिसून येत नाही. सगळीकडे नुसता व्यापार. गणेशमूर्तीला क्रय-विक्रेय वस्तू बनवून टाकली आहे. मूर्ती बनविणारे व मूर्ती घेणारे निर्बुद्धपणे या व्यवस्थेचा भाग बनले आहेत.

गणेशमूर्तीचा उद्योग गोत्यात आणून गणपती हेच सांगायचा प्रयत्न करतोय मातीशी नातं जोडा, स्थानिकतेला जोपासा, निसर्गाला जपा आणि हे जेव्हा कोणाला ऐकू येत नाही त्यावेळी शेवटचा उपाय म्हणून ही परिस्थिती निर्माण करून त्याने ह्यांच्या पाठीत सणसणीत रट्टा दिला आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही, भानावर या आणि बदल करा.

- डॉ. मीनल कुष्टे, लांजा