शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींतील गाळ उपसा रखडलेलाच

By admin | Updated: November 21, 2014 00:32 IST

विपरित परिणाम : खेडमध्ये ९७ विहिरी

खेड : जिल्ह्यातील विहिरींतील गाळ उपसा गेली अनेक वर्षे रखडला आहे. यामुळे विहिरीतील पाण्याचे झरे बंद झाले आहेत. याचा परिणाम थेट पाणीपुरवठ्यावर होत आहे़ खेड तालुक्यात यापेक्षा वेगळी अवस्था नाही. खेड तालुक्यातील जवळपास ९७ विहिरीतील गाळ उपसा करणे आवश्यक आहे. याकरिता आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून हे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, शेकडो मजुरांना काम मिळणार आहे. गाळ उपसा झाल्याने या विहिरीत पाणी साठण्याचे प्रमाण वाढणार आहे़ यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे़ जिल्ह्यातील सुमारे १०४२ विहिरी गाळाने भरल्या आहेत़ यामध्ये खेड तालुक्यातील ९७ विहिरींचा सामावेश आहे. गाळ उपसा करण्याच्या कामाकरिता जिल्ह्यातील हजारो मजुरांना काम मिळणार आहे. तर खेड तालुक्यात शेकडो मजुरांना काम मिळणार आहे़ हे काम अंगमेहनतीचे आहे़ मात्र, अनेक कुटुंबांना वर्षातील १०० दिवस रोजगार मिळणार आहे. तालुक्यातील जमीन जांभ्या दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असूनही उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पाणीटंचाईच्या काळात सिंचन विहिरींचा फायदा तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना होतो़ मात्र, सर्वच विहिरींतील गाळ गेली अनेक वर्षे काढला नसल्याने विहिरीत पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे़ डिसेंबर महिन्यापर्यंत जेमतेम पाणी या विहिरीत असते. त्यानंतर सर्व विहिरी कोरड्या पडतात. गाळ न काढल्याने अनेक विहिरीतील पाण्याचे जुने झरे बंद झाले आहेत. कालांतराने या विहिरीच गाळाने भरून त्या बुजल्या जाण्याची भीती व्यक्त होत आहे़ त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात याचा या विहिरींचा काहीच उपयोग होत नाही. गाळ उपसा केल्याने पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. त्यासाठी अशा विहिरींमधून गाळ काढला जावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)कायमस्वरूपी उपाय आवश्यक