रत्नागिरी : शहरानजीकच्या कोकणनगर येथील साई वेल्डिंग वर्क्स दुकानाचे शटर उघडून त्यातील वेल्डिंग कामासाठी लागणारे
सुमारे ८३,८०० रुपयांचे साहित्य चाेरीला गेल्याची घटना १४ मार्च राेजी सकाळी ११ वाजता घडली. मात्र, या प्रकरणी शुक्रवारी (२६ मार्च) राेजी सायंकाळी उशिराने फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चाेरीप्रकरणी यासीन इब्राहिम मापारी (६९, रा. नायाबनगर कोकणनगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार शौकत दाउन मालदार आणि नसीम शौकत मालदार (दोघे रा.कोकणनगर, रत्नागिरी) यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाेघांनी त्याचे शटर उघडून त्यातील सामान चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे, तसेच त्या दुकानाला आपल्याकडील कुलूप लावून यासीन मापारी यांना दुकानात जाण्यापासून रोखले. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.