शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पंचायत राज समितीचे रिकाम्या हंड्यांनी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:14 IST

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या आवारात ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना बंद असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण केले. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पंचायत राज समितीचे आगमन होताच उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी रिकामे हंडे, प्लास्टिकच्या कॅनने समितीचे स्वागत केले.महावितरणच्या आडमुठेपणामुळे व बिलातील फरकामुळे ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी ...

चिपळूण : येथील पंचायत समितीच्या आवारात ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना बंद असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण केले. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर पंचायत राज समितीचे आगमन होताच उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांनी रिकामे हंडे, प्लास्टिकच्या कॅनने समितीचे स्वागत केले.महावितरणच्या आडमुठेपणामुळे व बिलातील फरकामुळे ओवळी, कळकवणे व वालोटी येथील प्रादेशिक नळपाणी योजना गेले तीन महिने बंद आहे. येथील ग्रामस्थ दर महिन्याला आपली नियोजित पाणीपट्टी भरतात. परंतु, फरकाची रक्कम तशीच राहिली आहे. याबाबत महावितरणने ग्रामस्थांना वेठीस धरले असून, सध्या पाणी बंद आहे. म्हणून शुक्रवारपासून कळकवणेचे सरपंच कविता आंबेडे, उपसरपंच सतीश सुर्वे, वालोटीचे सरपंच संदीप गोटल, ओवळीचे दिनेश शिंदे व स्थानिक ग्रामस्थांनी शुक्रवारी उपोषण सुरू केले.पंचायत समितीच्या सभापती पूजा निकम, माजी सभापती शौकत मुकादम, जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते अशोकराव कदम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष चित्रा चव्हाण, दशरथ दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, बाबू साळवी, पांडुरंग माळी, अ‍ॅड. अमित कदम, आदींनी त्यांची भेट दिली.पंचायत राज समितीचे आमदार बाळाराम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांचा प्रश्न जाणून घेतला व आज, शनिवारी जिल्हा परिषद येथे सांगता समारंभाच्यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी टेरव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किशोर कदम व त्यांच्या सहकाºयांनी तिवरे, आकले, रिक्टोली, कादवड, गाणे, वालोटी, खडपोली, ओवळी, करंबवणे, नांदिवसे, स्वयंदेव, तळसर, पिंपळी बुद्रुक, मुंढे, चिपळूण सती, कान्हे, अडरे, अनारी, टेरव, चिंचघरी या गावांना ग्रॅव्हिटीने पाणी योजना करण्याची शिफारस करावी, अशी मागणी केली. रिक्टोली नळपाणी योजना मंजूर असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी कार्यवाही व्हावी, अशी मागणी रिक्टोली ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली. नायशी राष्ट्रीय पेयजल योजनेतील ३६ लाख रुपये खर्चाबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, याबाबत सरपंच किशोर घाग यांनी मागणी केली. पंचायत समिती सदस्य अनुजा चव्हाण, माजी सदस्य व राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष जागृती शिंदे यांनीही आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले आहे.