शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

नादुरुस्त पंपामुळे पालीमध्ये पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 03:01 IST

पालीकरांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

- विनोद भोईर राबगाव/पाली : पालीकरांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार बंद पडणाऱ्या पंपांमुळे पालीत पाणीटंचाईचे सावट आले आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीमार्फत काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी तो पुरेसा नाही.पाली शहराला पाणीपुरवठा करणारे अंबा नदीवरील दोन पंप बिघडले आहेत. त्यामुळे टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाणी येत नसल्याने नागरिकांचे पुरते हाल झाले आहेत. ज्यांच्याकडे किंवा जवळपास एखादी बोअरवेल किंवा विहिरी आहे त्यांना तेथून पाणी भरावे लागते. मात्र या दोन्हींची सोय जिथे नाही तेथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची अथवा पाणी विकत घ्यावे लागत आहे.अष्टविनायकांपैकी एक, बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत मागील अनेक वर्षांपासून वारंवार कृत्रिम पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. येथील अंबा नदीतून पालीकरांना पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात सुद्धा नदीत मुबलक व पुरेसे पाणी असते. येथून चार पंपांद्वारे ते सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या चार साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते. त्यानंतर सर्व पालीत पाणीपुरवठा केला जातो. मात्र या दरम्यानचे मोठे अंतर, वाहिन्यांचा छोटा आकार, वारंवार फुटणाºया वाहिन्या, जुन्या व जीर्ण जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत.याशिवाय साठवण टाक्यांची दुरवस्था, सतत बिघडणारे व अपुºया क्षमतेचे पंप, जॅकवेलमध्ये गाळ साठणे, जुने वॉल फुटणे, मुख्य जल वाहिनीला जोडलेल्या इतर वाहीन्या, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा व अपुरे कर्मचारी अशा असंख्य कारणांमुळे पालीत नेहमी पाणी टंचाईभेडसावते.>नळ पाणी योजना २० वर्षांपासून प्रलंबितपालीत शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे. योजनेसाठी कोट्यवधी रु पयांचा निधी मंजूर होऊन देखील आजतागायत योजना कार्यान्वित झालेली नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून या योजनेचे निवडणुकीपुरते भांडवल करण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात योजना कार्यान्वित झालेली नाही.शासनाने केलेल्या २००८-०९ च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणाºया भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार, शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण ७ कोटी ७९ लाखांचा निधी व १० टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतु राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली. त्याबरोबर १० टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखील होता.>अंबा नदीवर असलेल्या पाणीपुरवठा करणाºया मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. मात्र लोकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेत आहोत. ग्रामपंचायतीमार्फत पालीकरांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. लवकरच पाणीपुरवठा करणाºया मोटारची दुरुस्ती होऊन पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ववत होणार आहे.- गणेश बालके, सरपंच,ग्रामपंचायत, पाली>गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नाही. अपुºया पाण्यामुळे मोठी गैरसोय होते. ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा होतोय, मात्र तो पुरेसा नाही.- छाया म्हात्रे, रहिवासी, पाली>आम्हाला काम करण्यासाठी फार कमी वेळ मिळाला आहे. विविध कामांसाठी फंड मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सर्व सदस्य सरपंच व उपसरपंच व सदस्य मिळून पडेल ते काम करु न पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी पदरचे पैसे देखील खर्च करत आहोत. लोकांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. यावर कोणीही राजकारण करु नये.- अमित निंबाळकर, सदस्य, ग्रामपंचायत, पाली