शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

लॉकडाऊनमुळे धबधबे ओस; पर्यटकांच्या आनंदावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खेड : पावसाला सुरूवात हाेताच डोंगररांगामध्ये नैसर्गिक झरे प्रवाहित होऊ लागतात. शहरापासून अवघ्या दहा किलाेमीटरवर असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खेड : पावसाला सुरूवात हाेताच डोंगररांगामध्ये नैसर्गिक झरे प्रवाहित होऊ लागतात. शहरापासून अवघ्या दहा किलाेमीटरवर असलेल्या जामगे, शिवतर येथे पावसाळ्यात अनेकांची पावले याठिकाणच्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी वळतात. मात्र, गेल्या दोन वर्षात कोविडच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे धबधब्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे धबधबे ओस पडले आहेत.

तालुक्यातील खोपी शिरगावच्या डोंगरमाथ्यावर दिमाखात उभा असलेला रघुवीर घाट पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटनाचे एक खास आकर्षण आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेला हा रखवालदार पर्यटकांना आकर्षित करतो. पावसाळ्यात एकदा तरी रघुवीर घाटात जायलाच हवे, या इराद्याने पर्यटक याठिकाणी दाखल हाेतात. एका बाजूला कोयना खोरे, घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला डोंगरउतार असलेल्या रघुवीर घाटाचा काही भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या घाटाचे महत्त्व आणखी वाढले आहे.

पश्चिम घाटात समाविष्ट असलेल्या सह्याद्रीमध्ये अनेक औषधी वनस्पती व विविध प्रकारची जैवविविधता आहे. येथील घाटात फिरताना त्याची प्रचिती येते. रघुवीर घाटात अनेक लहान-मोठे धबधबे उंच कड्यावरून खाली काेसळतात. रघुवीर घाटात असे लहान-मोठे अनेक धबधबे लक्ष वेधून घेतात. या धबधब्यांत भिजण्याचा आनंद लुटल्याशिवाय पर्यटकांना राहवत नाही. याठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटताना काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा रस्त्यावर दरड येते किंवा झाडे कोसळलेली असतात. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे असते. रघुवीर घाटातील वाढत्या पर्यटकांसाठी एकमेव हॉटेल उपलब्ध आहे. धबधब्यांच्या पाण्यात मनमुरादपणे डुंबल्यानंतर पर्यटक पोटपूजेसाठी या हॉटेलमध्ये धाव घेतात. पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असली तरी उर्वरित कालावधीत तुरळक वर्दळ असल्याने याठिकाणी व्यवसाय वाढ झालेली नाही.