शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईचा अध्याय यंदाही

By admin | Updated: October 21, 2014 23:39 IST

राजापूर तालुका : अर्जुना नदी महिनाभरातच कोरडी

पाचल : परिसरातील कित्येक गावांसाठी तारणहार ठरलेली अर्जुना नदी गाळामुळे श्वास कोंडल्याने आॅक्टोबर महिन्याच्या सरतेशेवटीच कोरडीठण्ण पडू लागली आहे. सध्या या नदीच्या पात्रात किरकोळ पाणीसाठा उरला असून थोड्याच दिवसात तोही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभोवतालच्या गावांना यंदाही पाणीटंचाई जाणवणार आहे.राजापूर तालुक्यातील कित्येक गावांसाठी अर्जुना नदी ही तारणहार ठरली आहे. राजापूर तालुक्याच्या पूर्व विभागातील डोंगराळ भागात उगम पावलेल्या अर्जुना नदीचे पात्र जवळपास ९० टक्के गाळाने भरले आहे. या पात्रात पूर्वीइतका पाणीसाठा होण्यासाठी जागाच शिल्लक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा तोकडा अभ्यास, वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयाची उदासिनता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमध्ये अडकलेली ही नदी भविष्यात या गावांसाठी खरोखरच तारणहार ठरु शकते का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.सामान्य जनतेच्या हितासाठी दळण-वळणाचे साधन म्हणून निर्माण झालेले कॉजवे गाळ साठण्याला सर्वात मोठे कारण ठरत आहे. अर्जुना नदीचा उगम तीव्र चढावावर असून पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे कित्येक पाणी वाहुन जाते. हे वाहुन जाणारे पाणी व बांधण्यात आलेल्या कॉजवेचे पाईप याचे समिकरण जुळत नसल्याने मोठ्या गतीने पळणाऱ्या पाण्याला कॉजवेमुळे अचानक लगाम लागतो व कॉजवेच्या वरील बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ साठतो.टंचाईच्या काळात लाखो रुपये खर्च करुन या परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी पुरवले तरी महिलांना दूरच्या गावात जाऊन पाणी आणावे लागते. त्यासाठी सक्षम पर्याय म्हणून या नदीतील गाळ काढणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत प्रशासन उदासिन असल्यामुळे वर्षानुवर्षाचा गाळ या नदीच्या पात्रात साठत आहे. त्यामुळे श्वास कोंडलेल्या नदीचा या परिसरातील गावांना उपयोगच होईनासा झाला आहे. (वार्ताहर)