शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पाणी मुबलक, पण पुरवठ्यात व्यत्यय

By admin | Updated: April 22, 2015 00:24 IST

रत्नागिरीतील विहिरी : शीळ धरण भागविणार रत्नागिरीकरांची तहान

प्रकाश वराडकर - रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात यंदाही मुबलक पाणी आहे. हे पाणी आॅगस्ट २०१५ पर्यंत पुरेल, असे पालिका सुत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, साठा मुबलक असूनही पाणी वितरण वाहिन्या जुनाट असून, कुचकामी ठरत असल्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. पाणी वितरण व्यवस्थेचे उपग्रहाद्वारे जीआयएस मॅपिंग झाले असून, सुधारणा व दुरुस्तीसाठी ५७ कोटींचा निधी सुजल योजनेतून नगरपरिषदेला मिळणार आहे.शहराला १९६५ पासून पानवल धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर चिपळूण पाटबंधारेच्या ताब्यातील शीळ धरणातून शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा केला जात आहे. नाचणे तलावातून काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते. एमआयडीसीकडूनही १००० घनमीटर पाणी घेतले जाते. मात्र, पानवल धरणातून फेबु्रवारीअखेरपर्यंतच पाणी उपलब्ध होते. त्यानंतर हे धरण आटत असल्याने अधिकचे पाणी शीळ धरणातून घेतले जाते. सध्या रत्नागिरी शहराला १४.२ दशलक्ष घनलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी १३००० घनमीटर पाणी हे केवळ शीळ धरणातून विद्युत पंपाद्वारे लिफ्ट करून साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्रात आणले जाते, तर १००० घनमीटर पाणी एमआयडीसीकडून घेतले जाते. नाचणे तलावातून केवळ ०.०५ घनमीटर पाणी मिळते.गेल्या काही वर्षांत रत्नागिरीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण पडताना दिसत आहे. शहरातील अपार्टमेंट्सची संख्या वाढत आहे. शहराची लोकसंख्याही काही प्रमाणात वाढली आहे. रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्हाभरातून कामाच्या निमित्ताने हजारो लोक दररोज शहरात येतात. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे परंतु शहराच्या बाहेर राहणारे असंख्य कर्मचारीही आहेत. या सर्व लोकसंख्येचा शहरातील अन्य सुविधांबरोबरच पाणी पुरवठा सुविधेवर परिणाम होतो. त्यामुळेच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे.सद्यस्थितीत रत्नागिरी शहरात ९,२०२ नळजोडण्या असून, त्यासाठीचे संपूर्ण वितरण जाळे मात्र खूप जुने आहे. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांचे जाळे कुचकामी झाले आहे. जीआयएस मॅपिंगच्यावेळी शहरातील या पाणी वितरण करणाऱ्या वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, जलवाहिन्या पूर्णपणे बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सुजल योजनेतून शहरातील जलवाहिन्यांची दुरुस्ती, आवश्यक तेथे नवीन जलवाहिन्या टाकणे, शीळ धरणापासून पुढे ५०० मीटर्सपर्यंतची मोठी जलवाहिनी जागोजागी गंजल्याने सातत्याने जलवाहिनी फुटण्याचे प्रकार होतात. त्यातून पाणीही मोठ्या प्रमाणात वाया जाते. पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे काही दिवस पाणीपुरवठा ठप्प होतो. ही जलवाहिनी बदलण्याबाबतचा प्रस्ताव आहे. एकूणच सुजल योजनेतून ५७ कोटीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे शासन दरबारी या प्रस्तावाबाबत सातत्याने पाठपुरावा करुन रत्नागिरी शहरातील पाणी व्यवस्थेची दुरुस्ती, नूतनीकरण लवकरात लवकर कसे होईल, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. पुरेसे पाणी असूनही ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, ही स्थिती बदलण्याची मागणी होत आहे. पाणीसाठवण टाक्या व क्षमता रत्नागिरीतील विहिरीखासगीसार्वजनिक३५१८पाणीपट्टी कर३ कोटीनळजोडण्या९,२०२दरडोई पाणीपुरवठा१३५ ली.आवश्यक दरडोई पाणीपुरवठा७० लीटरवितरण जलवाहिन्यांची लांबी१४० कि. मी.जलशुद्धीकरण प्रकल्पसाळवी स्टॉप, नाचणेपाणी वितरणासाठी येणारा खर्च (महिना)वीजबिलासह१९ लाखशहरातील विभागवार पाणीमोजणी मीटर्स९पाणी व्यवस्था कर्मचारीनियमीत२२कंत्राटी४०पाणीसाठवण टाक्या व क्षमता