शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वर बसस्थानकातील स्वच्छतागृहाची प्रतीक्षा संपणार

By admin | Updated: November 5, 2014 23:36 IST

प्रवाशांना दिलासा : कित्येक वर्षांची मागणी येणार फळाला

देवरुख : मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण आणि रत्नागिरीच्या मध्यवर्ती असणाऱ्या संगमेश्वर बसस्थानकाला असलेली सुलभ स्वच्छतागृहाची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. आमदार उदय सामंत यांच्या निधीतून संगमेश्वर बसस्थानकावरील स्वच्छतागृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ग्रामीण भागात असणारी बसस्थानके अत्यंत दुर्दैवी स्थितीत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा आणि माखजनप्रमाणेच मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण आणि रत्नागिरीच्या मध्यवर्ती असलेले संगमेश्वर बसस्थानकही अशाच सुविधांपासून वंचित राहिले आहे. साखरपा आणि माखजन बसस्थानकांच्या तुलनेत बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संगमेश्वर बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याचे काम राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हाती घेतले. यामध्ये गटारांची बांधणी, कंपाऊंड वॉल, काँक्रीटीकरण, रंगरंगोटीचा समावेश होता. या सर्व कामांच्या शुभारंभप्रसंगी येथील सुलभ स्वच्छतागृहाच्या उभारणीसाठी १० लाख रुपये मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात बसस्थानकाच्या नूतनीकरणाची अन्य कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, सुलभ स्वच्छतागृह उभारण्याचे काम मागे राहिल्याबद्दल महिला प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.संगमेश्वर एस. टी. स्थानक महामार्गावरचे मध्यवर्ती आणि महत्त्वाचे आहे. गोवा, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरीसह कोल्हापूर, सांगली, बेळगाव, अक्कलकोट, चिपळूण, कराड, मुंबई, पुणे, ठाणे, बोरिवली अशा लांब पल्ल्याच्या गाड्या येथून मार्गस्थ होत असतात. दिवसाकाठी हजारो प्रवाशांची या बसस्थनकात वर्दळ असताना प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या प्रसाधनगृहाची दुरवस्था मात्र प्रशासनाच्या लक्षात येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानकात असणारे सध्याचे प्रसाधनगृह अपुरे आणि अस्वच्छ असून, महिलांना याचा त्रास सहन करावा लागतो. येथील स्वच्छतागृहाचे सर्व पाणी थेट सोनवी नदीत सोडले जात असल्याने नदीचे पाणी दूषित करण्याचे कामही या प्रसाधनगृहातून होत आहे. आधीच अपुरे असलेले हे स्वच्छतागृह अद्ययावत करण्याची मागणी होत होती. संगमेश्वर - रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी या स्वच्छतागृहासाठी १० लाखांचा निधी मंजूर करून या कामात पुढाकार घेतला आहे. येथील स्वच्छतागृहाची फुटलेली टाकी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच स्वच्छतागृहाचे कामही सुरू केले जाणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या शेकडो प्रवाशांसह चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय थोड्याच दिवसात दूर होणार आहे. (प्रतिनिधी)चिपळूण आणि रत्नागिरीच्या मध्यवर्ती असलेले संगमेश्वर बसस्थानकही अशाच सुविधांपासून लांब.साखरपा आणि माखजन बसस्थानकांच्या तुलनेत बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संगमेश्वर बसस्थानकाचे नूतनीकरण करण्याचे काम राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतले हाती.१० लाखांचा निधी मंजूर.