शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कामे पूर्ण होऊनही उद्घाटनाची प्रतीक्षाच

By admin | Updated: August 29, 2014 23:10 IST

सुविधा नाहीत : ३० अंगणवाड्यांच्या इमारती नामधारी

रहिम दलाल  रत्नागिरी/ जिल्ह्यातील ३० अंगणवाड्यांच्या इमारतींची कामे पूर्ण होऊनही त्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. वीज कनेक्शन व पाणी कनेक्शन नसल्याने या अंगणवाड्यांच्या इमारती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत़ जिल्ह्यात २२६२ अंगणवाड्या मंजूर आहेत़ त्यापैकी १३१२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती आहेत़, तर ९५० अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ ग्रामीण भागामध्ये अंगणवाड्यांना गावकऱ्यांकडून जमीन मिळणे फार कठीण झाले आहे़ ग्रामीण भागातही जमिनीचे भाव वधारले आहेत़ त्यामुळे कोणीही जमीनमालक मोफत जागा देण्यास तयार होत नाही़ या अंगणवाड्यांतील मुले शाळा, मंदिरे आणि घरांच्या ओटीचा आसरा घेतात़ त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत तर इमारती नसल्याने त्या अंगणवाडी सेविकांना बालकांसाठी कसरत करावी लागते़  जिल्हा नियोजन मंडळाकडून अंगणवाड्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो़ मात्र, अंगणवाड्यांसाठी जागा मिळत नसल्याने हा निधी खर्चाविना पडून राहात असल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे़ जिल्हा वार्षिक योजनेतून ३ कोटी ८२ लाख ५ हजार रुपये देण्यात आले. त्यातून ४० अंगणवाड्यांची बांधकामे करण्यात आली़ त्यानंतर अंगणवाड्यांच्या इमारतीसाठी ६० प्रस्ताव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे आले होते़ त्यापैकी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ४१ अंगणवाड्यांसाठी २ कोटी ७६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे़ ग्रामीण भागातील ४० अंगणवाड्यांच्या इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत़ मात्र, ही बांधकामे पूर्ण असतानाही त्यामध्ये अंगणवाड्या अजूनही सुरु करण्यात आलेल्या नाहीत़ कारण इमारती पूर्ण असल्या तरी त्यामध्ये आवश्यक असलेली बाब म्हणजे वीज आणि पाण्याची सोय अजूनही करण्यात आलेली नाही़ या इमारतींना वीजजोडणी आणि नळ कनेक्शन जोडण्याची आवश्यकता आहे़ त्यामुळे या अंगणवाड्यांच्या इमारती उद्घाटनाविना बंद ठेवण्यात आल्या आहेत़ त्याबाबत मागील स्थायी समितीच्या सभेतही या विषयी जोरदार चर्चा करण्यात आली होती़ या इमारती डिसेंबर, २०१४ पूर्वी महिला व बालकल्याण विभागाकडे हस्तांतरित कराव्या, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत़