शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक बाबींमुळे गुहागर ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क असगोली : गुहागर ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, हे मशीन अद्याप ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

असगोली : गुहागर ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, हे मशीन अद्याप कार्यान्वितच करण्यात आले नसल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. जयंत दाभाेळे यांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यावेळी तांत्रिक बाबींमुळे व्हेंटिलेटर मशीन सुरू झाले नसल्याची माहिती देण्यात आली.

गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध झाले आहे. मात्र, अद्याप हे मशीन कार्यान्वित का झालेले नाही तसेच रुग्णालयातील परिचारिका विभाग कोरोना कक्षापासून दूर आहे. त्यामुळे ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांचे निरीक्षण करण्यासाठी तेथे परिचारिकाच नसतात. अन्य रुग्णांची तब्येत अचानक बिघडली तर कक्षाबाहेर थांबलेल्या नातेवाईकांना परिचारिकांना बोलावण्यासाठी धावपळ करावी लागते. या साऱ्या विषयांवर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी चर्चा केली़. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख अमरदीप परचुरे, युवा सेना शहरप्रमुख राकेश साखरकर, शाखाप्रमुख कल्पेश बागकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे आदेश मोरे, ऋषी कचरेकर आणि प्रतीक साखरकर उपस्थित हाेते.

व्हेंटिलेटरच्या प्रश्नाबाबत बाेलताना डॉ. दाभोळे म्हणाले की, हे मशीन उपलब्ध झाले आहे. मात्र, हे मशीन सुरु करण्यासाठी केवळ ऑक्सिजन सिलिंडरला पाईप जोडून भागत नाही तर स्वतंत्र उच्चदाबाची ऑक्सिजन वाहून नेणारी पाईपलाईन आवश्यक असते. ही पाईपलाईन बसविण्यासाठी वैद्यक विभागातील ऑक्सिजन पुरवठ्याचे काम करणाऱ्या अभियंत्यांची गरज असते. त्या संदर्भात आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पत्रव्यवहार करताना आणखी ५ व्हेंटिलेटर जोडता येतील, अशी पाईपलाईन बसविण्यास सांगितले आहे. त्यानुसार अभियंत्याने येऊन पाहणी केली आहे. आता जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पुढील कार्यवाही झाल्यावर हे काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

परिचारिका कक्षाबाबत डॉ. दाभोळे म्हणाले की, थेट कोरोना विभागात परिचारिका कक्ष उभारणे थोडे धोक्याचे आहे. तरीही कोरोना विभागाजवळ स्वतंत्र खोलीत परिचारिकांची व्यवस्था करणे शक्य आहे. त्याबाबतची कार्यवाही करता येईल.

यावेळी पाईपलाईन बसविण्यासाठी किंवा परिचारिका कक्ष बदलण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर हक्काने सांगा. युवा सेनेचे कार्यकर्ते ही कामे करण्यासाठी आपल्याला मदत करतील, असे आश्वासन डॉ. दाभोळे यांना देण्यात आले.

-------------------

गुहागर ग्रामीण रुग्णालयातील अडचणींबाबत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डाॅ़. जयंत दाभाेळे यांची भेट घेऊन चर्चा केली.