शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

सह्याद्रीच्या निवळी विद्यालयास राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार प्रदान

By admin | Updated: March 23, 2017 15:28 IST

५० हजार रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविले

आॅनलाईन लोकमतसावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय निवळी या विद्यालयास यंदाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार वन दिनानिमित्त मुंबई येथे राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मुंबई मंत्रालयात त्रिमूर्ती सभागृहात सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी अशोक विचारे व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांच्याकडे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक वनीकरण व वनविभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत देण्यात आला आहे . या पुरस्काराचे स्वरूप रु.५० हजार रोख, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव मलिक, रत्नागिरी जिल्ह्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक धुमाळ, शाळेचे शिक्षक जयसिंग शिंदे, बजरंग पाटील आदीसह वन खात्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थितीत होते. विद्यालयच्या २४ एकर जागेमध्ये आंबा, काजू, कोकम आदी कोकणातील विविध फळ लागवड केलेली आहे. रोपवाटिका, औषधी वनस्पती लागवड, पालकांना मोफत वैरण वाटप, वृक्ष संवर्धन, लोकसहभागातून उभारण्यात आलेले ३ वनराई बंधारे, वणव्यांचे आपत्ती व्यवस्थापन, कृषी विद्यालयांना क्षेत्र भेटी, गांडूळ खत निर्मिती. विशेष म्हणजे हि फळ लागवड ओसाड माळरानावर फुलवलेली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबदल संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा निकम, कार्याध्यक्ष शेखर निकम , संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन रावसाहेब सुर्वे व सर्व सदस्य यांचेकडून विद्यालयाचे अभिनंदन करण्यात आले. (वार्ताहर)