रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, गेल्या २४ तासांत १४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची वाढ होत असतानाच, कोरोना लसीचा साठा संपल्याने शुक्रवारपासून जिल्ह्यात लसीकरण बंद करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
जिल्ह्यात १०४ लसीकरण केंद्रे असून, गुरुवारी केवळ २३ लसीकरण केंद्रे सुरू होती, तर ८१ लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. जिल्ह्याला शासनाकडून १ लाख १ हजार १५० लसींचा पुरवठा करण्यात आला होता. त्यात ९६,१६७ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी ४,९८३ डोस शिल्लक होते. हा साठा एक दिवस पुरेल इतकाच होता. त्यामुळे केवळ २३ केंद्रांवरच लसीकरण सुरू होते. लस संपल्याने शुक्रवारपासून सर्वच लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत.
गुरुवारी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या १४० रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील ८१ रुग्ण तर, ॲन्टिजेन तपासणीतील ५९ रुग्ण आहेत. आरटीपीसीआर तपासणीमध्ये रत्नागिरीतील महिला रुग्णालयात ३३ रुग्ण, हातखंबा प्राथमिक आरोग्य १, आडरे प्राथमिक आरोग्य केंद्र २, शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १, उंबर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात ३, जाकादेवी आरोग्य केंद्रात १, दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ३, पिसई प्राथमिक आरोग्य केंद्रात, आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात २, राजापूर ग्रामीण रुग्णालयात १, वाटद प्राथमिक आरोग्य केंद्रात १, लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात ७, आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात २, वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात २, ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात १, पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात ४, जिल्हा शासकीय रुग्णालयात २, दापोली उपजिल्हा रुग्णालयात ७, वालावलकर रुग्णालयातील ७ रुग्ण आढळले.
ॲन्टिजेन तपासणीमध्ये लांजा ग्रामीण रुग्णालयात ३ रुग्ण, गुहागर ग्रामीण रुग्णालयात ७, दापोली उपजिल्हा रुग्णालय १४, मंडणगड ग्रामीण रुग्णालय १, पाली ग्रामीण रुग्णालय १, महिला रुग्णालय ४, साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र ६ रुग्ण, संगमेश्वर ३, चिपळूण प्राथमिक आरोग्य केंद्र २, पावस प्राथमिक आरोग्य केंद्र १, साखळोली प्राथमिक आरोग्य केंद्र १, आंजर्ले प्राथमिक आरोग्य २, आसूद प्राथमिक आरोग्य केंद्र १, चिंतामणी हाॅस्पिटल १, ॲपेक्स हॉस्पिटल १, परकार हॉस्पिटल ३, वालावलकर हॉस्पिटल २, आनंद कल्प २, संजीवनी हॉस्पिटलमधील २ रुग्ण आहेत.
एका कुटुंबात १२ रुग्ण
रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथे एकाच कुटुंबामध्ये १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका ९ वर्षीय मुलीचा समावेश आहे. त्यामुळे फणसोप परिसरामध्ये खळबळ उडाली असून, आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. रत्नागिरी तालुक्यात एकाच कुटुंबामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण मिळण्याची पहिलीच घटना आहे.