शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात दोन तरुणांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:33 IST

चिपळूण : चुलत्याने मारल्याच्या रागातून चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे, तर दहिवली ...

चिपळूण : चुलत्याने मारल्याच्या रागातून चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे, तर दहिवली येथे २८ वर्षीय तरुणाने मानसिक आजारातून आत्महत्या केली़ या दाेन्ही घटना बुधवारी घडल्या असून, पाेलीस स्थानकात नाेंद करण्यात आली आहे़

सूरज सदानंद शिंदे (३०, रा़ पेढांबे-दाभाडेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याची खबर सदानंद सखाराम शिंदे (५८, रा़ पेढांबे - दाभाडेवाडी) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदानंद यांची पत्नी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची माहिती घेण्यासाठी चिपळूण येथे गेली होती. सूरजने याबाबत विचारणा केली असता, लॉकडाऊनमुळे तारखा लागल्या नाहीत, असे सांगितले. त्यामुळे सूरज दारूच्या नशेत सदानंद यांच्या आईस बडबडत होता. तेव्हा सदानंद शिंदे यांच्या चुलत भावाने गैरसमज करून सूरजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यात त्यांच्यात वादविवाद होऊन चुलत्यांनी सूरजला हाताने मारहाण केली. त्या रागात मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास दरवाजाला आतून कडी लावून हॉलच्या लोखंडी चॅनलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची अलोर -शिरगाव पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत दहिवली बुद्रुक निमेवाडी येथील अमोल हेमकिरण घाग (२८) हा मानसिक आजारी असल्याने त्याने बुधवारी सकाळी ७.३० ते ८.४५ च्या कालावधीत कातळाचे शेत येथे गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची हेमकिरण गोंविद घाग (६४, रा़ दहिवली बुद्रुक निमेवाडी) यांनी सावर्डे पोलीस स्थानकात नोंद केली आहे.