चिपळूण : मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर येथील पंचायत समितीसमोर मंगळवारी बोलेरो पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी बोलेरो पिकअप चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जमीर हुसैन गोलंदाज (देवरुख-दत्तनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या बोलेरो पिकअप चालकाचे नाव आहे.
याबाबची फिर्याद अक्षय विजय जाधव (२१, रा. खेर्डी-खतातेवाडी) याने दिली आहे. अक्षय हा मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाने सावर्डेकडून खेर्डीकडे जात असताना तो मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास चिपळूण पंचायत समितीसमोर आला असता त्याचवेळी बहाद्दूर शेख नाक्याकडून संगमेश्वरला जाण्यासाठी आलेल्या बोलेरो पिकअप गाडीवरील चालकाने विरुद्ध बाजूला येऊन रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे न पाहता गाडी बेदरकारपणे चालवून अक्षय याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अक्षय हा जखमी झाला असून, त्याच्या दुचाकीचे तसेच बोलेरो पिकअपचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अक्षय याने दिलेल्या फिर्यादीनुसार गोलंदाज याच्यावर पोलीस स्थानकात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.