शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मोरवंडे येथे दुचाकीला डंपरची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे शाळा येथे भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे़ ...

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे शाळा येथे भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे़ विजय कृष्णा मोहिते (वय ४८) असे दुचाकीस्वाराचे नाव असून, तो चिपळूण तालुक्यातील तळसर मुंडे येथील रहिवासी आहे. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात रस्ता निसरडा झाल्याने घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मोहिते यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने अनर्थ टळला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण तालुक्यातील तळसर येथे राहणारे विजय कृष्णा मोहिते हे आपल्या दुचाकीवरून चिपळूण येथून खेडकडे येत होते. त्याची दुचाकी मोरवंडे शाळेसमोर आली असता समोरून येणारा डंपर पावसामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावरून घसरला आणि हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच हायवे मृत्युंजय दूत प्रसाद गांधी, रोहन इनरकर आणि अतुल जोशी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेले माेहिते यांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या मोहिते यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

----------------------------

मुंबई-गाेवा महामार्गावर खेड तालुक्यातील मोरवंडे येथे दुचाकीला डंपरने धडक दिल्याने अपघात झाला़