शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘आशापुरा मायनिंग’विरोधात दोन मतप्रवाह

By admin | Updated: March 27, 2016 01:03 IST

उद्या ठरणार भवितव्य : हजारो हातांना रोजगार मिळाल्याचे मत पण...

दापोली : आशापुरा मायनिंगच्या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असून, दुसरीकडे या मायनिंगमुळे हजारो हाताला रोजगारही मिळाला आहे. अनेकांनी लघुउद्योग सुरु केले आहेत. कंपनीच्या आर्थिक उलाढालीवर स्थानिक बाजारपेठेत तेजी आली होती. त्यामुळे ही कंपनी सुरु राहायला हवी, असा दुहेरी मतप्रवाह पहायला मिळत असून, कंपनीचे भवितव्य येत्या २८ मार्च रोजी ठरणार आहे. आशापुरा कंपनीने केळशी पंचक्रोशीत १० वर्षापूर्वी मायनिंगचे काम सुरु केले. या कंपनीला सुरुवातीच्या काळात स्वार्थापोटी काही लोकांनी विरोध केला होता. परंतु, त्यानंतर मात्र त्याच लोकांनी कंपनीमध्ये ठेके घेतले होते. विरोध करणाऱ्यांनी पद्धतशीरपणे आपले उखळ पांढरे करुन घेतले. पूर्वी अनेक विरोध झाले. परंतु, ते फार काळ टिकले नाहीत. ज्या-ज्या लोकांना काम मिळाले त्यांनी अन्य लोकांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे स्थानिक जनता मात्र कंपनीला विरोध करुन थकली. विरोध करणाऱ्यांनी पुढारपण मिरवून ठेके घेतले आणि त्यानंतर जनतेची साथ सोडली. त्यामुळे कंपनीला होणारा विरोध दुबळा झाला आहे. कंपनी विरोधातील लढ्यात सहभागी असणाऱ्या लोकांना कंपनीकडून कामसुद्धा मिळाले नाही. परंतु त्यांच्या म्होरक्याला मात्र लाखो रुपयांचे ठेके मिळाले. यापूर्वी विरोध करणाऱ्या गावपुढाऱ्यांनी केवळ मलई खाण्याचेच काम केले. त्यामुळे या पूर्वीचे आंदोलन हे वैयक्तिक स्वार्थापोटी झाल्याचा इतिहास आहे. कंपनीने काम दिले की, कंपनीच्या बाजूची भूमिका घ्यायची. कंपनीत ठेका मिळाला नाही की, विरोध करायचा असा उद्योग काही गावपुढाऱ्यांचा सुरु आहे. त्यामुळे या कंपनीबाबत ग्रामस्थांमध्ये दोन बाजूचे मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण प्रदूषणाची काळजी घेणाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी ‘एन्रॉन’ अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा करुन लोकांचे नुकसान केले होते. दाभोळचा भारती शिपयार्ड प्रकल्प डबघाईला आला असून, तालुक्यात रोजगार उपलब्ध करुन देणारा एकही प्रकल्प नाही. दापोली तालुक्यातील केळशी परिसरात आशापुरा मायनिंग हा रोजगार उपलब्ध करुन देणारा एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प बंद होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच दुसरीकडे हा प्रकल्प समुद्रात बुडवायला काही मंडळी निघाली आहेत. (प्रतिनिधी)