शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन जनावरे मृत्यूमुखी

By admin | Updated: April 6, 2016 00:22 IST

मुदतबाह्य इंजेक्शन : देवाचे गोठणेतील प्रकाराने खळबळ

राजापूर : मुदतबाह्य इंजक्शन दिल्यानंतर देवाचेगोठणे गावात अत्यवस्थ झालेल्या जनावरांमध्ये आणखी दोन जनावरांचा मृत्यू झाला असून, मृत जनावरांचा एकूण आकडा तीनवर पोहोचला आहे. दरम्यान, देण्यात आलेली इंजक्शन्स ही पशुवैद्यकीय विभागातर्फे देण्यात आली. प्रत्येकाकडून पन्नास रुपये घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती मालकांनी दिली आहे.देवाचेगोठणे गावातील रोहिदास गुरव, विवेक भालचंद्र नारकर व नितीन माया जाधव यांच्या जनावरांना गोचीड मरण्याची इंजक्शन्स देण्यात आली होती. त्यानंतर सर्वच्या सर्व जनावरे अचानक अत्यवस्थ झाली. त्यापैकी रविवारी रोहिदास गुरव यांच्या दुभत्या गाईचा मृत्यू झाला होता. उर्वरित जनावरांमध्ये विवेक भालचंद्र नारकर यांचा रेडा मृत्युमुखी पडला असून, रोहिदास गुरव यांच्या एका गाईचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्याशिवाय आणखी दोन वासरे अजूनही अत्यवस्थ असून, त्यांचा धोका कायम आहे. या आजारी सत्तावीस जनावरांमध्ये विवेक नारकर यांची सहा, नितीन जाधव यांची चार, तर रोहिदास गुरव यांची सतरा जनावरे असल्याची माहिती पुढे आली आहे.या सर्व जनावरांवर उपचार सुरु असले तरी वेळेवर उपचार न झाल्याने सर्वच जनावरे अत्यवस्थ होऊन मृत्यूशी झुंज देत आहेत.पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने देवाचेगोठणे गावात जनावरांना इंजक्शन्स देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी न जाता त्यांच्याऐवजी चक्क शिपाई गेला होता. त्यानेच ते लसीकरण केल्याची माहिती जनावरांच्या मालकांनी दिली, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय आपल्याकडून प्रत्येक जनावरामागे पन्नास रुपये घेतल्याची माहिती विवेक नारकर यानी पत्रकारांना दिली. ते घेतलेले पैसे कोणत्या कारणासाठी होते ते आपल्याला सांगण्यात आले नाही, अशीही माहिती विवेक नारकर यांनी दिली.एवढ्या जनावरांना लसीकरण करावयाचे असतानाच तेथे डॉक्टरऐवजी शिपाई कसा पाठवला गेला? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांसाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पशुवैद्यकीय अधिकारी फिरकतच नसल्याची कैफियत यावेळी मांडण्यात आली. (प्रतिनिधी)दुर्लक्ष : पशुधन मालकांकडे पाठपशुधन कमी होत असताना दुसरीकडे ज्यांच्याकडे पशुधन आहे, त्यांच्याबाबत पशुवैद्यकीय खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता होत आहे. या विभागाबद्दल देवाचेगोठणेत नाराजी आहे.कोणती कारवाई?पशुवैद्यकीय खात्याने दिलेली इंजेक्शन ही मुदतबाह्य होती. त्याबाबत आता संबंधितांवर कोणती कारवाई होणार? असा सवाल केला जात आहे.