शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कंटेनर-मॅक्सिमो अपघातात दोन ठार, पाच जखमी

By admin | Updated: July 31, 2014 23:26 IST

माय-लेकाचा समावेश : वेरळ घाटातील दुर्घटना

लांजा : राजापूर गंगेच्या दर्शनासाठी गुहागर पालशेतहून निघालेल्या भाविकांच्या टाटा मॅक्सिमो गाडीला कंटेनरने दिलेल्या धडकेत माय-लेक जागीच ठार झाले. या भीषण अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात वेरळ घाटामध्ये आज, गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. मृतांमध्ये आशा प्रमोद अडूरकर, दुर्वास अडूरकर यांचा समावेश आहे. गुहागर पालशेत येथील तोडणकर कुटुंबीय देवदर्शनासाठी टाटा मॅक्सिमो गाडी (एमएच ०४ इएक्स २९२०) घेऊन सकाळीच घराबाहेर पडले. प्रथम मार्लेश्वर येथे दर्शन घेऊन ते पालीमार्गे राजापूर येथील गंगेचे दर्शन घेण्यासाठी निघाले. १०.४५ वाजण्याच्या दरम्यान वेरळ बस स्टॉपनजीक डिझेल संपून त्यांची गाडी बंद पडली. सोबत आणलेले डिझेल भरून गाडी वेरळ घाट चढून पुढे जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरने मॅक्सिमोला धडक दिली.कंटेनरचा वेग आणि वजन यामुळे मॅक्सिमो फरफटत जाऊन रस्त्यालगतच्या दरडीवर चेपली गेली. कंटेनर मॅक्सिमो गाडीवर कलंडला. कंटेनरच्या मागील बाजूने मॅक्सिमो गाडी पूर्णत: अडकून पडली. त्यामुळे आशा प्रमोद अडूरकर (वय ३५) आणि त्यांचा मुलगा दुर्वास (१२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर लगेचच महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी अपघाताची माहिती लांजा पोलिसांना दिली. तोपर्यंत महामार्गावर थांबलेले वाहनचालक व प्रवासी यांनी गाडीतील मृणाली महेश तोडणकर (४२), महेश भिकाजी तोडणकर (४४), जितेंद्र भिकाजी असगोलकर (४०), संजय शांताराम कदम, चालक रवींद्र बाळ आग्रे यांना बाहेर काढले.गंभीर जखमी झालेल्या पाचही जणांना लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले.तत्पूूर्वी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, या अपघातामुळे थांबलेल्या वाहनांमधील प्रवासी यांनी गाडीत अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्नकेला. हातखंबा येथील वाहतूक पोलिसांनी क्रेन आणून महिलेला बाहेर काढले. त्याचपद्धतीने दुर्दैवी दुर्वासलाही बाहेर काढण्यात आले. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक किसनसिंग लालसिंग (४०, खेडी-राजस्थान) हा पळून गेला होता. त्याला वेरळ येथील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. अपघातानंतर एका बाजूने वाहतूक चालू होती. मात्र, कंटेनर काढण्यासाठी आलेल्या क्रेनमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद करण्यात आली होती. (प्रतिनिधी)