शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फुणगूस खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 22:56 IST

देवरुख : भरतीच्यावेळी खाडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पोहायला गेलेल्या पाचपैकी दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला. तिघांना वाचविण्यात यश आले. संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीतील कडेवठार येथे रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. प्रसन्न हेमंत रामपूरकर (वय १६), साहिल दिनेश सावर्डेकर (१४, दोघेही मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.दोन दिवसांपूर्वी ही मुले वार्षिक ...

देवरुख : भरतीच्यावेळी खाडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पोहायला गेलेल्या पाचपैकी दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला. तिघांना वाचविण्यात यश आले. संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीतील कडेवठार येथे रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. प्रसन्न हेमंत रामपूरकर (वय १६), साहिल दिनेश सावर्डेकर (१४, दोघेही मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.दोन दिवसांपूर्वी ही मुले वार्षिक पूजेनिमित्त फुणगूस चव्हाणवाडी येथे नातेवाईकांकडे आली होती. रविवारी या दोघांसह साहिल सावर्डेकर, साईराज कोंडविलकर, प्रथमेश दिनेश सावर्डेकर असे पाचजण फुणगूस खाडीपात्रात सकाळी १० वाजता पोहायला उतरले. यावेळी पाण्याचाव भरतीचा अंदाज न आल्याने हेपाचही जण बुडू लागले. ही माहिती कळताच खाडीकिनारी असलेल्या लोकांनी आरडाओरड केली. या दरम्यान ही मुले पाण्यात बेपत्ता झाले होती. ही बातमी कळताच लगेच स्थानिक ग्रामस्थांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले. तर साहिल सावर्डेकर (१४) याचा मृतदेह दुपारी १ वाजता खाडीत शोधण्यात यश आले. फुणगूस खाडीजवळ धक्क्यापासून सुमारे १२ फूट लांब तळाशी येथे दुपारी २ वाजता प्रसन्न हेमंत रामपूरकर याचा मृतदेह सापडला.या घटनेमुळे फुणगूस गावावर शोककळा पसरली आहे. स्थानिकांच्या बचाव मोहिमेमुळे व शोधकार्यामुळे अन्य तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. याबाबतची माहिती कळताच संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. झगडे, सी. पी. चव्हाण, वैभव नार्वेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. एस. झगडे करीत आहेत.