शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू

By admin | Updated: September 25, 2016 01:00 IST

ओसरगाव येथील घटना : वीज कंपनीकडून ६ हजारांची तातडीची मदत

कणकवली : ओसरगाव येथे विजेच्या तारांचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या दोन बैलांच्या मालकाला वीज वितरणच्यावतीने ६ हजारांची तातडीची मदत केली. साहायक अभियंता डांगी यांनी प्रभाकर सावंत यांच्याकडे मदत सुपूर्त केली. वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे बैलांचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ओसरगाव - कांसाळीवाडीतील प्रभाकर सावंत शनिवारी सकाळी आपल्या दोन्ही बैलांना चरण्यासाठी घेऊन जात होते. नेहमीच्या पायवाटेवरून जात असताना तुटून पडलेल्या प्रवाही विजेच्या तारांचा स्पर्श होऊन दोन्ही बैल जागीच मृत्यूमुखी पडले. तसेच विजेचा धक्का बसून सावंतही जखमी झाले. या घटनेनंतर पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. तातडीची मदत आणि नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सर्पे यांनी वीजवितरण अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वेर्लेकर यांनी घटनास्थळी जाऊन बैलांचे शवविच्छेदन केले. दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे सावंत यांचे ७५ हजारांचे नुकसान झाले. तलाठी सिंगनाथ यांनी पंचनामा केला. वीजवितरणच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडली असून उपकार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. (प्रतिनिधी)