शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बुरंबी येथे वृक्ष कोसळून वाहतूक तीन तास ठप्प

By admin | Updated: August 31, 2014 23:41 IST

प्रवाशांचे हाल : महामार्गावर वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होतेय वाढ

देवरुख : संगमेश्वर - देवरुख राज्य मार्गावर बुरंबी हनुमान मंदिरसमोर रस्त्याच्या मधोमध पडलेल्या वृक्षामुळे पहाटेपासून हा मार्ग सुमारे तीन तास ठप्प होता. यामुळे मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे हाल झाले. वृक्ष उन्मळून कोसळण्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने प्राणहानी टळली आहे.ऐन गणेशोत्सवाच्या काळात पावसाने संततधार सुरु ठेवल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. कोसुंब या ठिकाणी वडाचे झाडदेखील रस्त्याच्या बाजूलाच कोसळून पडले होते. मात्र, त्याचा अडसर होत नव्हता.संगमेश्वर - देवरुख मार्गावर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बुरंबी मुचरी माळ तिठ्याजवळ व हनुमान मंदिराच्या समोर जांभळीचा वृक्ष रस्त्याच्या मधोमध पडला होता. यामुळे रात्री मुंबईहून देवरुख, साखरपा, देवडे या नेहमीच्या गाड्या संगमेश्वर बसस्थानकात काही काळ थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या कोळंबेमार्गे कोसुंब व्हाया सोडण्यात आल्या. यामुळे संगमेश्वर ते कोसुंब या दरम्यानच्या मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे हाल झाले.वृक्ष कोसळल्याची कोणत्याच शासकीय यंत्रणेला माहिती नसल्याने सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी वृक्ष हटवून मार्ग मोकळा केला. तोपर्यंत कोणतीही यंत्रणा घटनास्थळापर्यंत पोहोचली नव्हती. आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे, अशी शेखी मिरवणाऱ्या शासकीय यंत्रणेचे पितळ यानिमित्ताने उघडे पडले आहे.मात्र, पहाटे घटनास्थळी जावून मार्ग मोकळा करुन वाहतूक सुरळीत करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना खोळंबलेल्या प्रवाशांनी धन्यवाद दिली. या वृक्षामुळे संगमेश्वरहून देवरुखकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची मोठी रांग लागली होती. सुमारे तीन तास हा मार्ग ठप्प होता. त्यामुळे होणाऱ्या खोळंब्यामुळे प्रवाशी हैराण झाले होते. (प्रतिनिधी)