मंडणगड : गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे सुशोभित भारत कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरामध्ये ‘पोषण वाटिका वृक्षारोपण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मीक परहर, विभागीय समन्वयक डॉ. भरतकुमार सोलापुरे, राष्ट्रीय सेवा याेजना कार्यक्रमाधिकारी प्रा. शरिफ काझी, डॉ. संगीता घाडगे, प्रा. मुकेश कदम, प्रा. संदीप निर्वाण उपस्थित होते. या वेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मीक परहर यांनी सांगितले की, वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धन ही आज काळाची गरज बनली असून महाविद्यालयीन युवकांनी आपापल्या परिसरात निदान एकतरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करावे. ‘निसर्ग वाचला तर आपण वाचू’ याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोकम, नारळ, आंबा, काजू आदी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली.