शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाचा निधी नियोजनकडे परत- पावणेदोन कोटी रूपये अखर्चित

By admin | Updated: September 4, 2014 23:29 IST

चिपळूण नगर परिषद : पर्यटनाच्या कामांची ऐशीतैशी,

चिपळूण : बारावा वित्त आयोग पर्यटन विकास योजनेअंतर्गत शहरातील विविध विकासकामे ही काही अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे उर्वरित निधी जिल्हा नियोजन मंडळाकडे जमा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन यांनी नियोजन मंडळाच्या बैठकीत नगर परिषद चिपळूण प्रशासनाला दिले होते. त्यानुसार १ कोटी ७२ लाखाचा निधी नियोजन मंडळाकडे जमा करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली होती. या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. चिपळूण नगर परिषद अंतर्गत रामतीर्थ तलाव, पुरुषोत्तम व शंकर महादेव पुतळ्यानजीक सुरक्षा भिंतीचे बांधकाम करणे, पर्यटकांना बसण्याची व शौचालयाची सुविधा निर्माण करणे यासाठी ४० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे. ४ महिन्यात २७ लाख ५४ हजार रुपये खर्च झाले. मात्र कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करावा व काम थांबवावे अशी सूचनाही करण्यात आली होती. याचप्रमाणे नगर परिषद कार्यालयासमोर सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी ५० लाखाचा निधी नगर परिषद प्रशासनाकडे जमा करण्यात आला होता. दि. ३० जून पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना कळविले होते. मात्र, या कामाची अद्यापही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे. रामतीर्थ तलाव येथे व्ह्यू पॉर्इंट व संरक्षक भिंतीचे कामही अर्धवट स्थितीत आहे. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास गेल्या काही महिन्यापूर्वी मंजुरी घेण्यात आली होती. हे कामही थांबविण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी नगर प्रशासनाने केली होती. पवन तलाव येथे प्रवेशद्वाराजवळ सौंदर्यीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन बांधकाम अभियंता भालचंद्र क्षीरसागर व लिपीक सचिन शिंदे यांनी दिले होते. मात्र याबाबतही अद्याप कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. गोवळकोट येथे जेटीचे बांधकाम करण्यासाठी ५० लाखाचा निधी जमा नगर परिषदेला देण्यात आला असून, ४२ लाख ४२ हजार रुपये कामाचा अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करण्यात आला आहे. मात्र, या कामाचा निधी पूर्वपरवानगीशिवाय संबंधितांना अदा करण्यात येऊ नये, अशी सूचनाही जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केली होती. त्यानुसार व पालिकेतील सदस्य मूग गिळून गप्प बसल्याने हा निधी नियोजनकडे परत पाठविण्यात आला. (प्रतिनिधी)