शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील अंतर्गत रस्त्यावर वाहनांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:34 IST

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी येथील पोलीस यंत्रणेकडून बाजारपेठेतील मुख्य रस्ता सील करण्यात आला आहे. परिणामी ...

चिपळूण : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी येथील पोलीस यंत्रणेकडून बाजारपेठेतील मुख्य रस्ता सील करण्यात आला आहे. परिणामी बाजारपेठेला पर्यायी असलेल्या अंतर्गत रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी वाढली आहे. बुधवारी वडनाका ते बेंदरकरआळी परिसरात अक्षरशः वाहनांचा चक्का जाम झाला होता. बाजारपेठेतील गर्दी कमी होण्याऐवजी वाहतूक कोंडीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गेले महिनाभर येथील बाजारपेठ बंद असून, मुख्य रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी चिंचनाका ते बाजारपूलदरम्यानचा मार्ग बॅरिकेट्स उभारून बंद केला आहे. त्यामुळे या मार्गाने सकाळच्या सत्रात एकही वाहन सोडले जात नाही. त्याचवेळी बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी काही दुकाने उघडी राहत असल्याने अनेकजण खरेदीसाठी येतात. त्यामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्याला पर्यायी मार्ग असलेल्या ठिकाणी वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. मंगळवारी शहरातील खेड रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर बुधवारीही वडनाका, बेंदरकरआळी, वाणीआळी व जुन्या कालभैरव मंदिराकडील रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. एकाचवेळी तिन्ही मार्गावरून वाहने आल्याने काहीवेळ चक्का जाम झाल्याची स्थिती निर्माण झाली होती.

एकीकडे गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांनी केलेली ही उपाययोजना असली, तरी त्याचे विपरित परिणाम होताना दिसत आहेत. मुख्य रस्त्यावर गर्दी न होता अंतर्गत रस्त्यावर वाहनांची ये-जा वाढल्याने त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या प्रकाराने अंतर्गत भागातील नागरिकही हैराण झाले आहेत. आधीच अरुंद रस्ते आणि त्यात वाहनांची गर्दी होऊ लागल्याने नागरिकांना घराबाहेर येणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने ही गर्दी टाळण्यासाठी अन्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकतर मुख्य रस्ता खुला करावा, अन्यथा सकाळच्या सत्रात शहरात बाहेरून येणारी वाहने रोखण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

...........................

कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांनी गर्दी न करता संयम बाळगणे गरजेचे आहे. तूर्तास अंतर्गत मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता काही ठिकाणी एकेरी वाहतूक होईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच लोटे व खडपोली औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाजारपेठेतून न सोडता गुहागर बायपास व महामार्गाने सोडण्याबाबत उपाययोजना करीत आहोत.

देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक, चिपळूण