शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम घाटातील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे पर्यंत दररोज पाच तास राहणार बंद

By अरुण आडिवरेकर | Updated: April 20, 2023 21:03 IST

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दाैऱ्यात त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाने वेग घेतला आहे.

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहतूक २५ एप्रिल २०२३ ते १० मे २०२३ या कालावधी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी गुरूवारी रात्री उशिरा दिले आहेत. या कालावधीमध्ये हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे मिळवण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दाैऱ्यात त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाने वेग घेतला आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. साधारण ५.४० किलाेमीटर इतक्या लांबीचा हा घाट असून, त्यातील ४.२० किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित १.२० किमी भाग हा डोंगररांगा आणि खोल दरीचा असल्यामुळे चौपदरीकरणाच्या कामासाठी अवघड स्वरूपाचा आहे. त्यामुळे हे काम करताना घाट वाहतुकीसाठी बंद करावा, अशी मागणी कशेडी परशुराम हायवे प्रा. लि. या नियुक्त ठेकेदाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तर रत्नागिरी विभागासह येथे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण – रायगड यांनीही ही मागणी केली होती.

घाटातील वाहतूक बंद ठेवल्यास अधिक वेगाने काम करता येईल, अशी धारणा हे काम करणाऱ्या नियुक्त ठेकेदार कंपनीची आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात येत हाेती. अखेर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गुरूवारी रात्री उशिराने हा घाट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार २५ एप्रिलपासून घाटातील वाहतूक बंद राहणार आहे.