शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

जिल्ह्यात आजपासून सागरी मासेमारी सुरू

By admin | Updated: August 1, 2016 00:21 IST

बंदरे गजबजणार : हद्दीच्या बाहेर व्यवसायाला प्रारंभ

 रत्नागिरी : गेल्या दोन महिन्यांपासून सागरी मासेमारीवर शासकीय बंदी होती. ही बंदी ३१ जुलै २०१६ रोजी संपुष्टात आली आहे. १ आॅगस्टपासून जिल्ह्यातील सागरी मासेमारी सुरू होणार असून त्यासाठी मासेमारी नौका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पर्ससीन मासेमारी नौकांनाही ठरवून दिलेल्या सागरी हद्दीच्याबाहेर मासेमारी करता येणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच मासेमारी बंदरे गजबजणार आहेत. एकिकडे सागरी मासेमारीवरील शासकीय बंदी संपली असली तरी अद्यापही सागराचे रौद्र रुप पाहता सागर खवळलेला दिसून येत आहे. त्यातच पावसाचा जोरही कायम आहे. परिणामी १ आॅगस्टपासून मासेमारी सुरू होणार असली तरी ती अंशत:च राहील, असाही अंदाज व्यक्त होत आहे. मोठ्या मासेमारी नौका खोल सागरातील मच्छीमारीसाठी नारळी पौर्णिमेनंतरच जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातही पावसाचा जोर कमी झाला तर मोठ्या मासेमारी नौका सागरात मासेमारीस जाण्याचीही शक्यता मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे. पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या अनेक छोट्या नौका आहेत. १० वावाच्या आतील सागरी क्षेत्रात या नौका मासेमारी करीत असल्याने या नौका १ आॅगस्टपासूनच मोठ्या संख्येने मासेमारीसाठी सागरात जाण्याच्या तयारीत आहेत. मासेमारीची सर्व सज्जता झाली आहे. पर्सनेट नौकांवरील खलाशीही गेल्या आठवड्यातच रत्नागिरीत दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी) घुसखोरी थांबणार? गेल्या काही वर्षापासून कोकणच्या सागरी क्षेत्रात केरळ, तामिळनाडूतील मोठ्या क्षमतेच्या फिशिंग बोटी सातत्याने घुसखोरी करीत असल्याचे चित्र आहे. या बोटी कोकणच्या सागरी क्षेत्रातील माशांची मोठ्या प्रमाणात लूट करीत असल्याने ही समस्या कशी सोडविली जाणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्हच आहे. यंदा स्थिती काय राहणार याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. प्रजननासाठी किनाऱ्यावर आलेले मासे जाळ्यात! रत्नागिरीसह जिल्ह्यात बाजारपेठांमध्ये छोटे व मोठे बांगडे, सुरमई विक्रीसाठी येत आहेत. छोट्या होड्यांमधून याआधीच समुद्राच्या, खाड्यांच्या भागात आधीच मासेमारी सुरू झाली आहे. या मासेमारीत बांगड्यांमध्ये अंड्यांचे प्रमाण अधिक आहे. अजून बांगडा प्रजननासाठी किनाऱ्यालगत आहे. मोठा बांगडाही जाळ्यांमध्ये सापडणार आहे.