शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बेदखलांसाठी आज आयुक्त जिल्ह्यात

By admin | Updated: June 9, 2015 01:00 IST

कुळांच्या समस्यांकडे लक्ष : समितीचा आजपासून दोन दिवसीय दौरा

रत्नागिरी : कोकणातील बेदखल कुळांच्या प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करुन शासनाला शिफारस करण्याकरिता कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपेलवार यांची समिती उद्या, मंगळवारपासून दोन दिवस जिल्हा दौरा करणार आहे. विशेषत: यावेळी जमिनीला कूळ लावणे (७० ब) या दाव्यांमध्ये येणाऱ्या अडचणी ते जाणून घेणार आहेत. कूळ कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली कूळ वहिवाट शाखेकडे दाखल झालेल्या दाव्यांमध्ये जमिनीला कूळ लावणे (७० ब), दिवाणी कोर्टाकडून तहसीलदारांकडे आलेले संदर्भ (८५ अ), कूळकायद्याच्या भंग झालेल्या प्रकरणान्वये सरकारजमा करण्यासंदर्भातील कारवाई (८४ क), घरभाट विक्री प्रकरण (१७ ब), कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची खरेदी किंमत निश्चित करणे (३२ ते ३२ र) या प्रमुख पाच प्रकारच्या दाव्यांचा समावेश होतो. या दाव्यांमध्ये जमिनीला कूळ लावणे (७० ब) चे दावे अतिशय क्लीष्ट ठरत आहेत. या दाव्यांमध्ये तहसील न्यायालय हे बेसीक न्यायालय असते. हे दावे लढण्यासाठी कुळांना वकील करण्यासाठी खर्च लागतो. तसेच कुळांना आपण कसत असलेल्या जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी खंडाची पावती द्यावी लागते. मात्र, जमीनमालक पावती देत नसल्याने दावा दाखल होताना अडचणी येतात. तसेच या दाव्यांमध्ये असलेली साक्षीदारांची संख्या, वारसतपास, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या तसेच अन्य तांत्रिक अडचणी यामुळे हे दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. यामुळे कूळ म्हणून नाव लागण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते.या अनुषंगाने कोकण आयुक्त मोपेलवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती या दौऱ्यादरम्यान रत्नागिरी व सिंंधुदुर्र्ग जिल्ह्यांतील बेदखल कुळांच्या प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करणार आहे. त्यांच्यासमवेत विश्वनाथ रामचंद्र पाटील, विक्रमगड, (जि. पालघर), गोपीनाथ झेपले, (देवरुख), दौलतराव पोस्टुरे, (मंडणगड), राजाभाऊ कातकर (रामपूर - चिपळूण), सुजित झिमण, (रत्नागिरी), सुरेश खापले, (वहाळ - चिपळूण) हे सदस्य आहेत.दौऱ्याच्या वेळी समिती निवेदने, सूचना स्वीकारणार आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, बेदखल कुळे, सामाजिक संघटना यांनी आपली लेखी स्वरुपातील निवेदने, सूचना समितीला सादर कराव्यात. या गावभेटीच्या वेळी निवेदन देणे शक्य न झाल्यास विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन, महसूल शाखा पहिला मजला, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ या पत्त्यावर १५ जून २०१५ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन कोकण विभाग उप आयुक्त (महसूल) यांनी केले आहे. (प्रतिनिधी)समितीचा सविस्तर दौरामंगळवार, ९ रोजी सकाळी ११ वाजता खेडशी, दुपारी ३.३० वाजता कोळंबे (ता. रत्नागिरी). बुधवार, १० रोजी सकाळी ११ वाजता कोसंबी, (ता. चिपळूण), दुपारी ३.३० वाजता मौजे असगोली (ता. गुहागर).