शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेती अवजारांचे थकीत अनुदान जमा

By admin | Updated: February 23, 2016 00:36 IST

दोन वर्षानंतर शेतकऱ्यांना मिळाला न्याय

रत्नागिरी : जिल्ह्यातील कृषी विभागाच्या बेजबाबदार कार्यपध्दतीमुळे तब्बल दोन वर्षांपासून थकीत राहिलेले शेती अवजार खरेदीतील ११ लाख ६३ हजार रूपयांचे अनुदान आमदार राजन साळवी यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतंर्गत जिल्ह्यातील ६३ शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदान तत्वावर पॉवर टीलर व पॉवर स्प्रेअर मिळण्यासाठी विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर केले होते. संबंधित प्रस्तावांना कृषी विभागाकडून दि. ३ मार्च २०१४ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर बँकांकडून कर्ज काढून शासन नियुक्त दुकानातूनच शेती अवजारे खरेदी करावीत, या कृषी विभागाच्या अटीनुसार संबंधित शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी केली. शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यात कृषी विभागाकडून अनुदान जमा न झाल्याने शेतकऱ्यांना स्वत: या अवजारे खरेदीचे हफ्ते भरावे लागत होते. याबाबत तालुका व जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, ८ ते १० दिवसांत खात्यात अनुदान जमा होईल, असे सांगण्यात येत होते. सातत्याने कृषी कार्यालयात संपर्क साधून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी अखेर जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार अर्ज सादर केला. परंतु, यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांनी पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे येथे अनुदान जमा न झाल्याचे अर्ज दिले. यावर संबंधित कार्यालयाने अनुदानाची रक्कम रत्नागिरी येथे वर्ग केल्याचे स्पष्टीकरण दिले. शेतकऱ्यांनी पुणे येथील कार्यालयाच्या उत्तराचा संदर्भ घेऊन पुन्हा जिल्हा कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांनी बँकांमधून चौकशी केली असता ६३ पैकी फक्त २० शेतकऱ्यांंच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा झाल्याचे व उर्वरीत ४३ शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याचे निदर्शनास आले. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका व जिल्हा कृषी कार्यालयाकडे विचारणा केली असता दोन्ही कार्यालयांनी पुन्हा उडवा-उडवीची उत्तरे दिली. अखेर तब्बल दोन वर्षे कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या शेतकऱ्यांनी आमदार राजन साळवी यांची भेट घेऊन माहिती दिली. आमदार साळवी यांनी कृषी कार्यालयाकडे पाठपुरावा केल्याने उर्वरीत ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकतीच ११ लाख ६३ हजार ४६७ रुपये अनुदानाची रक्कम जमा झाली. (प्रतिनिधी) ४११ लाख ६३ हजार रुपयांचे अनुदान. ४कृषी विभागाच्या बेजबाबदार कार्यपध्दतीमुळे दोन वर्षांपासून अनुदान थकीत. ४शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर जमा.