शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

त्या तरूणांनी दाखवली समयसूचकता

By admin | Updated: July 29, 2014 00:00 IST

आगरोधक उपयोगी : ...अन आगीचे संकट टळले, त्यांचा संसार वाचला

शृंगारतळी : संकटात धावून येतो तोच खरा मित्र, हा सुविचार येथील नागरिकांनी नुकत्याच येथे घडलेला एका आगीच्या घटनेनंतर खरा करून दाखवला. दोन दिवसांपूर्वी शृृंगारतळी येथील गणेश मोरे यांच्या फ्रीजला पहाटेच्या वेळी आग लागली. आग एवढी भयानक होती की, आणखी पाच-सहा मिनिटे विझविली नसती तर मोरे यांच्या संपूर्ण घराला आगीने वेढले असते. शेजारी कोणी नाही, पहाटेची साखरझोपेची वेळ. मदतीला कोण धाऊन येणार? असा प्रश्न होता. मात्र, मोरे यांच्या घरासमोर विनायक पेट्रोलपंप आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या सुभाष मुढेकर, संतोष शिर्के, योगेश आग्रे या कर्मचाऱ्यांच्या नजरेला त्या आगीची घटना जाणवल्याने मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी पेट्रोलपंपाच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेले आगरोधक यंत्र घेऊन घटनास्थळी धाव घेतली.खिडकी फोडून त्यांनी रसायन फवारून आग विझवली. त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. त्यांच्या या धाडसामुळे मोरे यांचा संसार वाचला आहे. आग क्षणात विझली असली तरी तरूणांचे कार्य मोठे आहे. अशीच दुसरी आगीची घटना गतवर्षी शृृंगारतळी मुख्य बाजारपेठेत घडली होती. एका गॅसशेगडी दुरूस्तीच्या दुकानात शेगडी दुरूस्त करताना पाईप लिकेजमुळे सिलिंडरने आग पकडली. आग आटोक्यात येत नव्हती. सिलिंडरचा स्फोट होण्याच्या भीतीने प्रत्येकजण पळत होता. त्याचवेळी शेजारच्या नितीन फार्माचे मालक नितीन बेलवलकर यांनी आपल्या मेडिकलमधून आगरोधक यंत्र आणून क्षणात आग विझविल्याने बाजारपेठेतील मोठे संकट टळले होते. त्याच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या झाल्या. (वार्ताहर)-आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याआधीच मोरे यांचा संसार वाचवणाऱ्या मुढेकर, शिर्के यांचे कौतुक.-आपण केवळ बघ्याची भूमिका घेतो, या प्रथेला तरूणांनी दिला छेद.-पेट्रोलपंपावर ठेवलेल्या आगरोधक यंत्राबाबतचा निर्णय त्वरित घेतल्याने संकट टळले.-गतवर्षी लागलेल्या आगीच्या आठवणी ताज्या.