शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

खर्च भागवण्यासाठी दागिने विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:25 IST

पर्ससीन नेट बंदी : मासेमारी हेच जीवन असणाऱ्या व्यावसायिकांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न

रत्नागिरी : मासेमारी बंद असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली असून, पर्ससीन नेट नौकाधारक सोन्याचे दागदागिने विकून खलाशांचा पगार तसेच बँकांचे हफ्ते भरण्यासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही पिढ्यांपासून केवळ मासेमारी हाच एकमेव व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणारे मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे त्यांनी इतर व्यवसायाकडे किंवा नोकरी करण्याकडे न वळता आपल्या पुढील पिढीलाही मासेमारी या व्यवसायातच गुंतवून ठेवले. त्यामुळे आज केवळ मासेमारी व्यवसाय हेच जीवन आहे. त्यासाठी शासनाने ही बंदी घालताना भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करुन बंदी घालणे आवश्यक होते, असे पर्ससीन नेटधारक मच्छीमारांचे म्हणणे आहे. या बंदीचा फटका मच्छिमारांव्यतिरिक्त इतर व्यावसायिकांनाही बसला आहे. आजची बाजारपेठेतील परिस्थिती पाहता इतर व्यवसायिकांचा निम्माही धंदा होत नाही. त्यामुळे पर्ससीन नेट मासेमारीवरील बंदी न उठवल्यास मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शेतकऱ्यांपेक्षा भयानक स्थिती मच्छीमारांची होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.पर्ससीन नेटने मासेमारी पूर्णपणे बंद असल्याने अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या पर्ससीन नेट नौका मालकांना खलाशांचे हप्ते तसेच त्यांना द्यावा लागणारा महिन्याचा पगार भागवतानाही अडचणीचे ठरत आहे. तसेच नौका बंद असल्या तरी खलाशांच्या जेवणाचा खर्चही उचलावा लागत आहे. त्यामुळे अधिक अडचणीचे ठरत आहे. वातावरणातील बदलामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पर्ससीन नेट मच्छीमारांवर शासनाकडून बंदी लादण्यात आल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे बँकांचे हप्तेही भरणा केलेले नाहीत. त्यासाठी पै-पै करुन आपल्या कुटुंबियांसाठी तयार केलेले सोन्याचे दागिनेही नौका मालकांनी विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आणखी काही दिवस हे मासेमारी बंदचे संकट कायम राहिल्यास या आर्थिक अडचणीत सापडलेल्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शिवाय शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे पर्यायही उरणार नाही, असेही काही मच्छिमारांचे म्हणणे आहे. त्यासाठी ही बंदी उठवण्याबाबत शासनाने लवकरात लवकरच निर्णय घ्यावा, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)पर्ससीन नेटवर बंदी घातल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या फायद्याचे ठरेल, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर पारंपरिक मच्छीमार मोठ्या प्रमाणात मासेमारी करतील, ही अपेक्षा फोल ैठरली आहे.पर्ससीन नेटवर अनेक संसार अवलंबून आहेत. या मच्छीमारीवर बंदी आल्याने हे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. याबाबत शासनाने त्वरित निर्णय घेण्याची मागणी होत आहे.गेली अनेक वर्षे पर्ससीन नेटने मच्छीमारी सुरु आहे. मग आताच बंदी का? व्यावसायिकांप्रती शासनाचे काहीच कर्तव्य नाही का? असा सवाल या मच्छीमारांनी उपस्थित केला आहे.पर्ससीने नेट मासेमारीवर बंदी.खलाशांचा पगार व इतर खर्च भागवणे मुश्किल.कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मच्छीमारांकडे बँकांचा तगादा.पिढ्यान्पिढ्या मासेमारीवरच अवलंबून.कुटुंबियांच्या अंधारमय भविष्याने मच्छिमार चिंताग्रस्त.