शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

ट्रकच्या धडकेत एस.टी.तील ४ प्रवासी जागीच ठार मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश

By admin | Updated: May 15, 2014 00:29 IST

रत्नागिरी : ट्रकची धडक बसल्याने एस्.टी.ची उजवी बाजू कापत गेली आणि एस्. टी.तील चार प्रवासी जागीच ठार झाले आणि ट्रकचालकासह १२जण गंभीर जखमी झाले.

 रत्नागिरी : ट्रकची धडक बसल्याने एस्.टी.ची उजवी बाजू कापत गेली आणि एस्. टी.तील चार प्रवासी जागीच ठार झाले आणि ट्रकचालकासह १२जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला असून, त्यात एका १३ वर्षीय युवतीचाही समावेश आहे. बसमधील सीटवर बसल्या जागीच या प्रवाशांचा झालेला मृत्यू सार्‍यांच्याच धक्का देणारा होता. मृतदेह पाहणार्‍याचा थरकाप उडवणारा हा अपघात रत्नागिरी तालुक्यातील पालीनजीकच्या नागलेवाडी येथे आज बुधवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. सदरची बस रत्नागिरीहून कोल्हापूरला जात होती. ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की मागे फेकल्या गेलेल्या बसची अन्य दोन वाहनांना धडक बसली. त्यांचेही नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावर दुतर्फा गाड्यांची रांग लागली होती. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे गायत्री दीपक भालेराव (१३) व दीपाली योगेश भालेराव (३२, रा. लोणार, जि. बुलढाणा), सुनिता शंकर गार्डी (६२, धनावडेवाडी, देवळे, ता. रत्नागिरी) अशी आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या एका पुरूषाची ओळख पटलेली नाही. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये योगेश बाळकृष्ण भालेराव (३६) व अंकिता गोविंद दलाल (१९, दोघेही रा. लोणार, जि. बुलढाणा), शंकर गोपाळ गार्डी (६६), शशिकुमार शंकर गार्डी (३६) व शिल्पा शशिकुमार गार्डी (३२, तिघेही रा. धनावडेवाडी, देवळे, ता. रत्नागिरी), तातोबा हरी पाटील (५५, रा. शिराळा, कोल्हापूर), रेखा प्रकाश कुंभार (३५, रा. नाणीज, ता. रत्नागिरी), राजाराम सोनू आखाडे (४२, रा. तरवळ, रत्नागिरी), बसचालक संजय महादेव सावंत (मलकापूर), महिला वाहक दिलशान मुसारी बागवान (कोल्हापूर आगार), ट्रकचालक मंजुल मुबारक हुसैन (४२, रा. उदयपूर, राजस्थान) व अन्य अत्यवस्थ असलेली व नाव न सांगू शकणारी एक महिला यांचा समावेश आहे. मृतदेह व जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीजच्या रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आणले गेले. साखरपामार्गे कोल्हापूरला जाणारी बस (एमएच ०७सी ९१९३) घेऊन संजय सावंत दुपारी २.३० वाजता रत्नागिरीतून निघाले होते. हातखंबा येथून पुढे कापडगाव ते चरवेली दरम्यान नागलेवाडी येथील एका अवघड वळणावर समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (आरजे१७जी ०८६९) बसला जोरदार धडक दिली. या ट्रकमधून टायरची वाहतूक केली जात होती. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळे बसचा उजवीकडील बहुतांश भाग कापला गेला व बस पाठीमागे फेकली गेली. ट्रकमधील काही टायरही बसवर पडले. ही बस मागून येणारी स्कॉर्पियो (एमएच-२८/ व्ही ७४५५) व मारुती स्विफ्ट (एमएच-२७/ एआर ९१२३) या दोन गाड्यांना धडकली व त्या दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले.