शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तीनपदरी मार्गाचे उपविभागीय कार्यालय चिपळुणात

By admin | Updated: July 16, 2017 18:08 IST

कार्यकारी अभियंत्यांनी दिली माहिती

आॅनलाईन लोकमतचिपळूण (जि. रत्नागिरी), दि. १५ : गुहागर - विजापूर या तीनपदरी मार्गाचे उपविभागीय कार्यालय चिपळूण येथे होणार असल्याचे कार्यकारी अभियंता बामणे यांनी दिल्याची माहिती माजी सभापती व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिली. गुहागर - विजापूर मार्गाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी व विविध अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी माजी सभापती मुकादम यांनी कळंबस्तेचे उपसरपंच विवेक महाडिक, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पालांडे, दशरथ जाधव, विकास जोडवेकर आदींच्या शिष्टमंडळासह कार्यकारी अभियंता बामणे यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. गुहागर - विजापूर मार्गाबाबतचे मुख्य कार्यालय कोल्हापूर येथे आहे. त्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्यास या भागातील जनतेला कोल्हापूर येथे हेलपाटे मारावे लागतील. यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरु असताना चिपळूण येथे उपविभागीय कार्यालय करावे, अशी मागणी मुकादम यांनी केली. यावेळी ही मागणी मान्य करताना गुहागर - विजापूर या तीनपदरी मार्गाचे काम महिनाभरात सुरु होणार असल्याचे बामणे यांनी सांगितले. गुहागर - विजापूर मार्गासाठी २७२ कोटींचा निधी खर्च होणार असून, या रस्त्याची तीन ठेकेदारांना वर्कआॅर्डर देण्यात आली आहे. चिपळुणातील गुहागर नाका ते भाजीमंडईच्या मागच्या बाजूने हा रस्ता काढण्यात येणार असून, शीव नदीवरील पूलही नव्याने बांधण्यात येणार आहे. या रस्त्याची रुंदी १० मीटर राहणार असून, त्याला साईडपट्टी राहणार आहे. खेर्डी बाजारपेठेत या रस्त्याचे रुंदीकरण होणार नसून, घाटामध्येही केवळ अवघड वळणे रुंद करण्यात येणार आहेत. गणपतीनंतर या कामाचे जिल्ह्याच्या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे. त्यामुळे गुहागर - विजापूर हा मार्ग चिपळूण बाजारपेठेतून जाणार हे आता निश्चित झाले आहे. माजी सभापती मुकादम यांनी या रस्त्याच्या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.