शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

रत्नागिरीत तीन दुकाने भीषण आगीत भस्मसात

By admin | Updated: February 12, 2017 23:28 IST

पंधरा लाखांचे नुकसान; शॉर्टसर्किटने दुर्घटना

रत्नागिरी : शहरातील मारुतीआळी परिसरात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना मध्यरात्री १२.१५च्या सुमारास घडली. या आगीत तिन्ही दुकानांचे मिळून सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेची नोंद शहर पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.मुस्तफा महमद शफी ईब्जी (३३, कोकणनगर, रत्नागिरी) यांचे मारुती आळी परिसरात ‘हमेरा कलेक्शन’ नावाचे दुकान आहे. या दुकानाला लागूनच ‘वेलकम फुटवेअर’ व ‘स्टार जनरल स्टोअर्स’ ही दुकाने आहेत. मुस्तफा शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास दुकानात शॉर्टसर्किट झाले. मुस्तफा यांचे कपड्याचे दुकान असल्याने आतील कपड्यांनी पेट घेण्यास सुरुवात केली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. त्यामध्ये ‘हमेरा कलेक्शन’ हे दुकान जळून खाक झाले. या आगीचे रूप इतके भीषण होते की, आगीने बाजूच्या दुकानांना वेढा दिला. त्यामुळे बाजूला असलेल्या वेलकम फुटवेअर व स्टार जनरल स्टोअर्स या दुकानांनीही पेट घेतला. ही दुकाने जळून खाक झाली. या आगीत तिन्ही दुकानांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आजूबाजूच्या नागरिकांनी मदतीचा हात देत ती विझविण्याचाप्रयत्न केला. परंतु तो अपयशी ठरला.मारुती आळी परिसरात आग लागल्याची माहिती समजताच शहर पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेत फिनोलेक्स व नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तब्बल दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली. यावेळी फायरमन संतोष गझने, मोहन कदम, यशवंत शेलार, जोगेंद्र जाधव, प्रकाश गझने, भगवान बेंद्रे व किशोर ढेपसे या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. (वार्ताहर)