अडरे : चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावातील पाण्याचे नमुने गोळा करुन ते कामथे प्रयोगशाळेत तपासण्यात आले. या ४२४ पाणी नमुन्यांपैकी २६ नमुने हे दूषित आढळले आहेत. यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकही पाणी नमुना दूषित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६६ पैकी ४ नमुने हे दूषित आढळले आहेत. त्यामध्ये आंबतखोल कामथे (महाडिकवाडी), कोंडमळा (निवाचीवाडी), सावर्डे (बागवेवाडी), सावर्डे आंबतखोल (तांबटवाडी), अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६२ पैकी १ नमुना दूषित आढळला आहे. यामध्ये वालोपे (बौध्दवाडी), दादर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४ नमुने दूषित आढळले आहेत. यामध्ये तिवरे (फणसवाडी), कळकवणे (मधलीवाडी), पिंपळी खुर्द (मधलीवाडी), पिंपळी खुर्द, खरवतेअंतर्गत मिरजोळी (चिपळूणकरवाडी), कापरेअंतर्गत बिवली (धरणवाडी), दोणवली (भोईवाडी), दोणवली (ब्राह्मणवाडी), दोणवली (शिर्केवाडी) तर रामपूर, फुरुस, शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकही पाणी नमुना दूषित आढळलेला नाही. वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १२ नमुने दूषित आढळले आहेत. त्यामध्ये निवळी परिटगाव (कुंभारवाडी), चौसुपीवाडी, वहाळ - निवळी (कोष्टेवाडी), निवळी (काजारेवाडी) व (लाखणवाडी), निवळी (बौध्दवाडी), वहाळ ब्राह्मणवाडी, मोरेवाडी, चर्मकारवाडी, वडेरु (मधलीवाडी), ढाकमोली, तोंडली (बौध्दवाडी) यांचा समावेश आहे. (वार्ताहर)
तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दूषित पाण्याचे नमुने ‘नील’
By admin | Updated: December 8, 2015 00:38 IST