शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पतसंस्थांचे तीन कोटी रूपयांचे व्यवहार पूर्ण थंडावले!

By admin | Updated: November 15, 2016 23:27 IST

दीपक पटवर्धन : नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे दैनंदिन ५0 लाखांचे सोनेतारण व्यवहार ठप्प

रत्नागिरी : पतसंस्थांमध्ये सोनेतारण व्यवहाराला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. मात्र, नोटा बदलाच्या निर्णयानंतर चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यास पतसंस्थांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पतसंस्थांचे सुमारे तीन कोटी रूपयांचे व्यवहार थंडावले आहेत. कदाचित या व्यवहारांचा तोटा भरून निघेल. पण ५० लाखांचा दैनंदिन सोनेतारण व्यवहार यामुळे ठप्प झाला आहे आणि ते पतसंस्थांसाठी नुकसानदायक ठरत आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, राज्य पतसंस्था फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक आणि सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष तसेच स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली. राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांना नोटा बदलण्याचे, चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, पतसंस्थांना तसे अधिकार नाहीत. त्यामुळे पतसंस्थांमधील बहुतांश व्यवहार ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था या जिल्ह्यातील मोठ्या पतसंस्था आहेत. त्यांच्याप्रमाणेच अन्य २४-२५ पतसंस्थांचे दैनंदिन कामकाजही मोठे आहे. मात्र, सध्या या सर्वांनाच नोटा बदलाची झळ पोहोचली आहे. पतसंस्था सुरू आहेत, १०० किंवा ५० रूपयांच्या नोटा घेऊन येणाऱ्या लोकांचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. मात्र, ५०० आणि हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास पतसंस्थांना परवानगी नसल्याने ९५ टक्के व्यवहार बंद झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. ज्यांना ठेवी ठेवायच्या आहेत, कर्ज घ्यायचे आहे ते चार दिवसांनी येतील. पण सोनेतारण व्यवहाराला मात्र याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्व पतसंस्थांमध्ये मिळून दररोज ५० लाख रूपयांचे सोनेतारण कर्ज दिले जाते. मात्र, सध्या ही कर्ज प्रकरणे बंद आहेत. नव्या चलनातील इतकी मोठी रक्कम पतसंस्थांकडे नाही. त्यामुळे हे व्यवहार थंडावले आहेत. जोपर्यंत सोनेतारण व्यवहाराला गती येत नाही, तोपर्यंत हे नुकसान होत राहणार असल्याचे ते म्हणाले. मान्यता नसतानाही पतसंस्थांनी ५०० किंवा १००० रूपयांच्या नोटा स्वीकारल्या तर ती चूक ठरेल. यामुळे संबंधित पतसंस्थेची आणि नोटा भरणाऱ्याची चौकशी सुरू होऊ शकते. बँका या नोटा स्वीकारत आहेत, ही सरकार व रिझर्व्ह बँकेने दिलेली सुविधा आहे. त्यामुळे पतसंस्थांनी अशा नोटा स्वीकारू नयेत, असे मत त्यांनी मांडले. सद्यस्थितीत या निर्णयाचा लोकांना त्रास सहन करावा लागत असला तरी हा निर्णय अतिशय धाडसी आणि उपयुक्त असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. यामुळे झालेले सकारात्मक परिणाम येत्या काही कालावधीतच सर्वांसमोर येतील, असे सांगितले. (प्रतिनिधी)