शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नौका उलटून तीन भावांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेली आयशाबी ही नौका उलटून तीन सख्ख्या भावांसह चारजण बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये घडली. बुडालेल्या चौघांपैकी जैनुद्दीन पठाण, अब्बास पठाण आणि हसन पठाण या तीन सख्ख्या भावांचे मृतदेह सापडले असून, सायंकाळी उशिरापर्यंत तव्वकल अब्दुलसत्तार बांगी याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेली आयशाबी ही नौका उलटून तीन सख्ख्या भावांसह चारजण बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये घडली. बुडालेल्या चौघांपैकी जैनुद्दीन पठाण, अब्बास पठाण आणि हसन पठाण या तीन सख्ख्या भावांचे मृतदेह सापडले असून, सायंकाळी उशिरापर्यंत तव्वकल अब्दुलसत्तार बांगी याचा शोध लागलेला नाही.सागरी महामार्गावरील पूर्णगड येथील जैनुद्दीन लतिफ पठाण हा आयशाबी नावाची मासेमारी नौका (एनडी एमएच ४ एमएम २९८१) घेऊन सोमवारी जेवण आटोपून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी बाहेर पडले. जैनुद्दीन पठाण याच्यासोबत त्याचे दोन सख्खे भाऊ अब्बास, हसन आणि आणखी एक सहकारी तव्वकल अब्दुलसत्तार बांगी हेही नौकेवर होते. रात्री मुसळधार पावसामुळे जैनुद्दीन व त्याचे भाऊ १.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा पूर्णगड जेटीवर येण्यासाठी निघाले होते. खाडीच्या मुखाशी जोरदार लाटेच्या तडाख्याने ही नौका पलटी झाली. त्यामध्ये जैनुद्दीन, अब्बास, हसन आणि तव्वकल बांगी हे चौघेही समुद्रात पडले. नौका समुद्रात बुडत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी खाडीच्या दिशेने धाव घेतली; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.जवळपास दहा तास या चौघांचा शोध पोलीस, कोस्टगार्ड व ग्रामस्थ घेत होते. त्यामध्ये जैनुद्दीन पठाण, अब्बास पठाण, हसन पठाण या तिघांचे मृतदेह पोलिसांना सापडले असून, तव्वकल बांगी याचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.