शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरीप्रकरणी रत्नागिरीत तिघांना अटक

By admin | Updated: August 24, 2014 00:37 IST

वर्षभरानंतर यश : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी : शहराजवळील खेडशी येथील दुकानाचे छप्पर फोडून दुकानातील १३ मोबाईल व रोख रक्कमेसह १७ हजार रुपये किंमतीचा ऐवज वर्षभरापूर्वी चोरी केली होती. या चोरीप्रकरणी रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तिघा चोरट्यांना आज शनिवारी अटक केली.दि. २९ जुलै, २०१३ रोजी रात्री सुशांत सुधीर रसाळ (पाली, ता. रत्नागिरी) यांचे खेडशीनाका येथील मोबाईल दुकानाचे छप्पराचा सिमेंटचा पत्रा कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील १३ मोबाईल हॅण्डसेट व ६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १७ हजार रुपयांचा माल चोरीस गेला होता. त्याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधिक्षक डॉ. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी मामा कदम, जमीर पटेल, सुशिल पंडीत, उदय वाझे, संदिप मालप, प्रविण बर्गे, गुरु महाडीक, रमिझ शेख, राजू गमरे यांचे खास पोलीस पथक तयार करुन या प्रकरणी चोरट्यांचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत होते. पोलीस अधिक्षक डॉ. शिंदे, पोलीस निरिक्षक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन, पोलीस पथकाने किरण फुंडलिक गोसावी (२०, जाकादेवी, रत्नागिरी), प्रथमेश ऊर्फ संकेत मोहन शिवगण (२२, जाकादेवी, रत्नागिरी) आणि गणेश प्रविण भागवत (१७, पानवल) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून चोरीचे ४ मोबाईल व रोख रक्कम ११ हजार रुपये असा एकूण १५ हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत केला. तसेच आरोपी संकेत शिवगण याचे राहत्या घरातून चायना कंपनीचे अन्य एकूण २१ मोबाईल हॅण्डसेट पोलीसांनी हस्तगत केले. पोलीस तपास करत आहेत. (शहर वार्ताहर)